Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज
लोकसत्ता गणेश उत्सव स्पर्धा 2023 अंधेरी ते कुलाबा उत्कृषट मूर्ती चे मानकरी ठरले "श्री बाळ गणेश उत्सव मंडळ" भाजी गल्ली, ग्रँट रोड पश्चिम, मुंबई. 7.
मुंबई : संदिप शां. शिंदे
दरवषी प्रमाणे यंदा ही लोकसत्ता दैनिक यांची गणेश उत्सव स्पर्धा झाली अंधेरी ते कुलाबा येथील विविध मंडळांनी स्पर्धेसाठी नामांकन अर्ज केले होते प्रत्येक मंडळातील श्री गणेशाच्या सुंदर सुबक मुर्त्या विविध रूपातील मुर्त्या भाविकांची मन भारावून घेत होत्या.
मुंबईतील प्रसिद्ध मूर्तिकार अजित कोरगावकर यांनी साकारलेली पाच फूट उंचीची श्री बाळ गणेश उत्सव मंडळ, भाजी गल्ली क्रॉस लेन, शंकर शेट मार्ग, ग्रँट रोड पश्चिम, मुंबई 7. या मंडळाची बैठी श्री गणेशमूर्ती आकर्षण ठरली, स्पर्धेची सर्वोत्कृष्ट मूर्ती चे मानकर ठरले. रोख रक्कम, प्रमाणपत्र, प्रमाण चिन्ह देऊन मंडळाला कार्यक्रमात गौरविण्यात आले.
यंदा मंडळाचे 75वे वर्ष होते शिवकालीन देखावा मंडळांनी साकारला होता प्रथमच दक्षिण मुंबईत गणेश उत्सवात शिव कालीन शस्त्राचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. स्पर्धेच्या निकालावर मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि स्थानिक रहिवाशांमध्ये उत्साह चे वातावरण असून मंडळ अध्यक्षांनी सर्व हितचिंतकांनचे आभार मानले.
रिपोर्टर