Breaking News
कोरोनाकाळात युद्धपातळीवर काम करणा-या शास्त्रज्ञ,डॉक्टरांना चिकित्सक भारतरत्न द्या! राष्ट्रीय उत्तर भारतीय समाज पार्टीची मागणी
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
कोरोनाच्या खडतर काळात ज्या वैज्ञानिक आणि डॉक्टरांनी युद्धपातळीवर काम केले त्यांना चिकित्सक भारतरत्न देऊन गौरविण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय उत्तर भारतीय समाज पार्टीच्यावतीने करण्यात आली आहे.
राष्ट्रीय उत्तर भारतीय समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय कुमार शर्मा यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान गृहमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना पत्र देऊन वैज्ञानिक आणि डॉक्टरांना चिकित्सक भारतरत्न देऊन गौरविण्याची मागणी केली आहे. कोरोनाच्या खडतर काळात त्यांनी दिलेले योगदान हे मोलाचे आहे. कोरोना काळात अथक परिश्रम घेऊन लस बनवण्याचे काम केलेल्या तसेच या काळात ज्यांना आपले प्राण गमवावे लागले त्यांना चिकित्सक भारतरत्न पदक द्यावे तर जे डॉक्टर कोरोना काळात मोठ्या कालावधीसाठी रूग्णांची अखंड सेवा करत आहेत अशा डॉक्टरांना 'चिकित्सक वीर रत्न' पुरस्कार द्यावा, अशी मागणी शर्मा यांनी केली आहे.
राष्ट्रीय उत्तर भारतीय समाज पार्टीच्यावतीने मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही आमच्या घाटकोपरच्या कार्यालयामध्ये १ ऑक्टोबरच्या रात्री बारा वाजल्यापासून उपोषणाला सुरूवात करणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय कुमार शर्मा यांनीयावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
तसेच गेल्या काही दिवसांपासून देशहित आणि कोरोना काळात काम करणा-या रिक्शा, टैक्सी चालकांना येणा-या समस्या आणि त्यांच्या कर्जाबाबत विविध मागण्या सरकारकडे करण्यात आल्या असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय महासचिव दिन मोहम्मद,राष्ट्रीय प्रवक्ता आशुतोष भारद्वाज और अनिल श्रीवास्तव, मुंबई युथ अध्यक्ष हसन शेख, महाराष्ट्र उपाध्यक्ष शरीफ कुरेशी, पूनम स्वराज आणि पार्टीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
रिपोर्टर