Breaking News
तोंडाच्या कॅन्सरवर लेझरद्वारे वेदनारहीत उपचार शक्य
- रूग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
आता तोंडाच्या कॅन्सरवर लेझरद्वारे उपचार पद्धती विकसीत झाल्याने रूग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. ही नवीन उपचार पद्धती ऑर्चिड कॅन्सर ट्रस्टने विकसित केली असून ही पध्दत वेदनारहीत असल्याने रूग्णांचा या उपचार पद्धतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
आपल्या देशात तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत असून वर्षाला सुमारे सत्तर हजारपेक्षा जास्त नागरिक यांना तोंडाचा कॅन्सर होत आहे, मात्र त्यांना यावर योग्य उपचार पद्धती माहीत नसल्यामुळे त्यांच्या शरीराचे विविध अवयव कापावे लागत आहेत. यामुळे त्यांना खूपच असह्य वेदना सहन कराव्या लागतात, मात्र आता लेझरद्वारे उपचार होत असल्याने रूग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. ऑर्चिड कॅन्सर ट्रस्टने विकसित केलेल्या या नविन उपचार पद्धतीमुळे रूग्णांचा तोंडाचा कॅन्सर हा बरा झाला असून हे रुग्ण आता सहज खाऊ आणि बोलू शकतात.
(प्रतिक्रीया )
यासंदर्भात अशोक मिश्रा यांनी आपले मांडले आहे. ते यावर असे म्हणाले की, मला जिभेचा कॅन्सर झाला होता. त्यामुळे मी नीट खाऊ देखील शकत नव्हतो. हा कॅन्सर इतक्या मोठ्या प्रमाणात होता की मला जिभेमुळे काही खाता येत नसून त्याचा खूप त्रास व्हायचा. बाहेर कुठे जायला मला लाज वाटायची आणि मी खूप घाबरायचो. त्यानंतर मी लेझरद्वारे उपचाराने कॅन्सर बरा होतो असे ऐकले होते. त्यानंतर मी ऑनलाईनवर या उपचाराची आणि ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरची माहिती घेतली. त्यानंतर मी या डॉक्टरांकडून माझे ऑपरेशन करून घेतले. तसेच यामुळे माझा शरीराचा कोणताही अवयव कापावा लागला नाही. या ऑपरेशनमुळे मला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. मी लेझर ट्रीटमेंटने ऑपरेशन करून घेतले. आता माझा कॅन्सर बरा झाला असून माझ्या ऑपरेशनला दोन वर्षे झाले असून मी आता आनंदी असून अगदी चांगल्या प्रकारे खाऊ आणि बोलू शकतो. मी कॅन्सर रुग्णांना हेच आवाहन करतो की, भारतात एकमेव असणाऱ्या लेझर उपचार पद्धतीची आपण पूर्णपणे ऑनलाइन जाऊन माहिती घेऊन आपले कॅन्सरचे ऑपरेशन करून आपला कॅन्सर बरा होऊ शकतो, असे आवाहन कॅन्सरमधून बरे झालेल्या अशोक मिश्रा यांनी केले आहे.
रिपोर्टर