Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्यूज.
थोडक्यात महत्वाची बातमी.
दक्षिण मुंबई तील भवन्स कॉलेज प्रशासकानाने मनपा अधिकाऱ्यांना आर्थिक फायद्यात केला मनपा रस्ता अनधिकृत कब्जा.. मनपा डी वॉर्ड कनिष्ठ अभियंता ने लाखो रुपये घेत अनधिकृत बांधकाम पाठीशी घालून प्रकरण दाबले..
मुख्यमंत्री, मनपा आयुक्त, यांच्या अनधिकृत बांधकामावर कायदेशीर कारवाई करण्याच्या आदेशाला मनपा डी वॉर्ड अभियंता यांनी केराची टोपली दाखवत अनधिकृत बांधकामला संरक्षण देण्यात आले.
मुंबई : संदिप शांताराम शिंदे.
दक्षिण मुंबई येथील प्रसिद्ध भवन्स कॉलेज नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहे कधी कॉलेज मधील प्रशासकीय अधिकाऱ्यानं कडून महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, कधी कॉलेज मधील ड्रग्स प्रकरणे, कधी मारामाऱ्या शिक्षणाच्या नावाखाली कॉलेज मध्ये इतर धंदे सुरू असतात. शिक्षणाच्या प्रवेशासाठी लाखो रुपये पालकांकडून उकळले जातात पण शिक्षणाच्या जागी भवन्स कॉलेज प्रशासक भ्रष्टाचारामध्ये गुरफटले आहेत.
भारतीय विद्या भवन आणि भवन्स कॉलेज मधील मनपा रस्ता "मनपा बावनखाणी मार्ग" असून सदर रस्ता काबीज करण्याचा याआधी दोनदा प्रयत्न झाला परंतु मनपा अधिकाऱ्यांनी अनधिकृत कामावर तोडक कारवाही केली होती. दोन वर्षापूर्वी पुन्हा अनधिकृत पणे मनपा बावनखाणी मार्गावर लोखंडी गेट बांधून मनपा रस्ता काबीज करण्यात आला या संदर्भात मनपा डी वॉर्ड परिक्षण विभागात ( Maintenance Dept ) तथा सहाय्यक आयुक्त डी वॉर्ड यांना तक्रार देण्यात आली कनिष्ठ अभियंता अमित माळी यांनी सदर अधिकृत बांधकामावर कारवाई करतो सांगून वेळोवेळी विविध कारणे सांगून प्रकरणे पाठीशी घातली या संदर्भात माहिती अधिकार पत्रे देऊन सुद्धा कारवाही करतो सांगून अमित माळी यांने कोणतीही कारवाई केली नाही.
मनपा डी वॉर्ड सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी सदर प्रकरणावर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले परंतु मिळालेल्या माहितीनुसार भवन्स कॉलेज प्रशासक यांनी अमित माळी आणि कार्यकारी अधिकारी संजय पोळ यांना अनधिकृत मनपा रस्ता काबीज केल्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी लाखो रुपये दिल्याचे समजते.
डी वॉर्ड सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांना उपायुक्त पद देण्यात आले असून कार्यकारी अधिकारी संजय पोळ यांची उचलबांगडी करण्यात आली आहे, परंतु अद्याप लाखो रुपये खाऊन अनधिकृत बांधकाम पाठीस घालणाऱ्या आणि अनधिकृत बांधकाम कारवाई न करणाऱ्या कनिष्ठ अभियंता अमित माळी निर्धास्त पणे अनधिकृत करीत असल्याचे सूत्रांकडून समजते. मनपा डी वॉर्ड नवीन सहाय्यक आयुक्त मनीष वाळुंज आणि कार्यकारी अधिकारी प्रशांत पाठक यांना सदर प्रकरणी माहिती नसल्याचे सांगत प्रकरण दाबण्यात अमित माळी प्रयत्न करीत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार मनपा आयुक्त भूषण गगराणी यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असून खुद्द मनपा रस्ता अनधिकृत पणे कब्जा केला गेला असून मनपा डी वॉर्ड परिक्षण विभागाने मंत्रांच्या आणि मनपा आयुक्त यांच्या अनधिकृत बांधकामांच्या कारवाई आदेशाला केराची टोपली दाखवली असून मनपा अधिकाऱ्यांना महाराष्ट्र राज्य सरकार आणि मनपा आयुक्त यांचा धाक उरलेला नसून महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचा कळस झाला खुद्द मनपा रोड चे गिळंकृत करण्यात आले. येत्या दिवसात कायदेशी कारवाही होणार किंवा नाही हा प्रश्न पडला आहे.. भ्रष्टाचारात शासकीय अधिकारी महाराष्ट राज्य सुद्धा विकतील यात शंकाच उरली नाही.
रिपोर्टर