Breaking News
दक्षिण मुंबई कॅटरिंग संघ आणि इव्हेंट्सग्रूप, शिवडीतर्फे चिपळूण येथील पूरग्रस्तांना साड्या, चादर आदी वस्तूंचे वाटप
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
- केतन खेडेकर
दक्षिण मुंबई केटरिंग संघ आणि इव्हेंट्स ग्रूप ग्रुप, शिवडी मुंबई यांच्यावतीने रत्नागिरी जिल्ह्यातील नवीन शंकरवाडी चिपळूण येथील ग्रामस्थांना चादर, साडी, टॉवेल, ब्लॅंकेट आदी वाटप करण्यात आले.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि पूरामुळे शंकरवाडी आणि परिसर पाण्याखाली येऊन प्रचंड प्रमाणावर वित्तहानी झाली होती. त्या घटनेची दखल घेत कॅटरिंग ग्रुपच्या नितीन कोलगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली फत्तेसिंग गुजर, संतोष आडविलकर विनायक मुंज, शेखर छत्रे यांनी स्थानिक ग्रामसेवक रविंद्र पतीयाने, अमोल बेर्डे, अमोल टाकळे यांच्या सहकार्याने ,परिसराची पाहणी करून पूरग्रस्तांना मदतीच्या किटचे वाटप केले. या वाटपादरम्यान 'आकार' या संस्थेच्या कुसूम कदम आणि सहकारी यांच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा परिचय झाला.
गुढघ्यापर्यंत साठलेल्या गाळातून अडकलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या पिशव्या आणि वस्तू गोळा करून या कचरासेविका या वस्तूंची विक्री करून त्यातून मिळालेल्या पैश्यातून खर्च वजा करून उर्वरीत रक्कम ग्रामपंचायतीला देतात. त्यांच्या या उदात्त कार्याची दखल घेत कॅटरिंग ग्रूपच्यावतीने या समाजसेवी संस्थेचा छोटीशी भेट देऊन गौरव करण्यात आला. तसेच या कचरावेचक सेविकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कारही करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संतोष शेट्ये, संतोष कोटकर, महेश कदम, नवनाथ परब, भालचंद्र जाधव आणि अमृता चव्हाण यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
"गरिब गरजू म्हणून नव्हे तर पूराच्या संकटात घरातील गाद्या, सतरंज्या यासह कपडे, पुस्तके आदी सर्वच वस्तू नष्ट झाल्यामुळे आम्ही मानवतेच्या दृष्टिकोनातून कोकणातील आपल्या या बांधवांना साहित्यपुरवठा करत आहोत ,असे दक्षिण मुंबई कॅटरिंग संघाचे नितिन कोलगे यांनी आपल्या या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले.
रिपोर्टर