Breaking News
भायखळ्यातील पोलीस बिट क्रमांक- २ चौकीचा पार पडला लोकार्पण सोहळा
पोलीस अधिका-यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
भायखळ्यातील पोलीस बिट क्रमांक- २ चौकीचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. या चौकीचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा आमदार यामिनी यशवंत जाधव यांच्या हस्ते पोलीस अधिका-यांसह विविध मान्यवरांची उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला.
शिवसेना उपनेते, माजी केंद्रीय मंत्री,खासदार अरविंदजी सावंत ,शिवसेना उपनेते, बृहन्मुंबई महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि भायखळ्याच्या आमदार यामिनी यशवंत जाधव यांच्या सूचनेनुसार तसेच प्रभाग क्रमांक २१० च्या स्थानिक नगरसेविका सोनम मनोज जामसुतकर यांच्या सौजन्याने आणि शिवसेना मा.नगरसेवक मनोज पांडुरंग जामसुतकर यांच्या विशेष प्रयत्नाने भायखळा पोलीस ठाणे,पोलीस बिट क्रमांक २ चौकीचे नूतनीकरण करण्यात आले.
याचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा आमदार यामिनी यशवंत जाधव, नगरसेविका सोनम मनोज जामसुतकर,शिवसेना मा.नगरसेवक मनोज पांडुरंग जामसुतकर, मध्य प्रादेशिक विभाग मुंबई अप्पर पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण,पोलीस उपआयुक्त परिमंडळ ३ मुंबई परमजीत सिंह दहिया, सहाय्यक पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) आग्रीपाडा विभाग सुधीर जांबवडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भायखळा पोलीस ठाणे अशोक खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शुभहस्ते संपन्न पार पडला. याप्रसंगी शिवसेना माजी नगरसेवक सुर्यकांत पाटील, शाखा प्रमुख हेमंत मयेकर, शाखा संघटक मेघा भोईर, उपशाखाप्रमुख जेठालाल राठोड, जगदीश नलावडे, माजी उपविभाग संघटक पुष्पाताई वस्त,महिला पदाधिकारी मेघा चेंदवणकर,सुनीता हिंगे,सीमा यादव,स्वाती सावंत कंकुबेन राबडिया,जमना अंजारा,शिवसैनिक मुस्ताक नाखवा अजय गुप्ता,किरण घोडके, प्रशांत टेमकर आदी मान्यवर उपस्थित होते.
रिपोर्टर