Breaking News
भाकाक महासंघाच्या असंघटित कामगार विभागावर सुरेश कु-हे यांची नियुक्ती
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
भारतीय कामगार कर्मचारी (भाकाक) महासंघाच्या असंघटित कामगार विभागावर संघटक सचिव म्हणून कामगार क्षेत्रातील तज्ज्ञ अभ्यासक सुरेश कु-हे यांची नियुक्ती कामगार नेते आमदार भाई जगताप यांनी दस-याच्या पूर्वसंध्येला केली.
सुरेश कु-हे यांचा कामगार क्षेत्रासह पत्रकारीतेतील अनुभव पाहता असंघटीत कामगारांना त्यांचे मार्गदर्शन होऊ शकते. नियुक्तीपत्र देताना छायाचित्रात आ.भाई जगताप, सचिव दिलीपदादा जगताप, कोषाध्यक्ष एस आर सावंत , सचिव दगडू बागवे दिसत असून सीएमएसचे प्रविण डोळस , महासंघाचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण मंत्री, उपाध्यक्ष अँड. विलास चिखले, विवेक कदम आदि उपस्थित होते.
असंघटित कामगार वर्गाने सुरेश कु-हे यांच्या नियुक्तीचे स्वागत करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. गेले अनेक वर्ष आम्ही कामगार क्षेत्रात काम करत असून कामगारांच्या व्यथा आम्हाला चांगल्याप्रकारे माहिती आहेत. यामुळे अनेक कामगारांचे व्यवस्थापना सोबत असलेले प्रश्न आम्ही सोडवत आहोत. यामुळे कामगार वर्गाची अपेक्षा होती की तुम्ही कामगारांचे प्रतिनिधित्व करावे, असे कुर्हे यावेळी म्हणाले. तसेच या दृष्टिकोनातून भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस आमदार भाई जगताप यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो विश्वास मी पूर्णपणे यशस्वी करून दाखवेन आणि कामगार वर्गाला न्याय देईल, असेही सुरेश कुर्हे यावेळी म्हणाले.
रिपोर्टर