Breaking News
आषाढी एकादशीनिमित्त जोगेश्वरीत ‘राजा पंढरीचा’ भक्ती गितांचा कार्यक्रम
- इच्छापुर्ती गणेश मंदिर, शामनगर तलाव येथे आयोजन
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
आषाढी एकादशीनिमित्त जोगेश्वरमध्ये ‘राजा पंढरीचा’ भक्ती गितांचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवारी १० जुलै २०२२ रोजी सायंकाळी ७ ते १० यावेळात ‘स्वरसागर मराठी वाद्यवृंद’च्या माध्यमातून आयोजन करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी येणार्या विठ्ठल भक्तांना विठ्ठलाचे दर्शन घेता यावे यासाठी पंढरपुर येथील विठ्ठलाच्या मुर्तीची प्रतिकृतीही उभारण्यात येणार आहे.
आषाढी एकादशीनिमित्त वारकर्यांना वेध लागले आहेत विठ्ठल रखुमाईच्या भेटीचे...मुसळधार पडणार्या पावसाची तमा न बाळगता, तहान, भुक हरपुन वारकरी डोईवर तुळसीचे रोपटे घेऊन.. टाळ, मृदुंगाच्या तालात रममाण होत... दरमजल करीत पंढरीकडे निघाले आहेत. वारकर्यांना आस लागली आहे ती विठ्ठल भेटीची...
परंतु वयोमानानुसार तसेच विविध कारणांमुळे अनेकांना वारकर्यांना वारीत जाणे शक्य होत नसल्याने...त्यांची ही अडचण लक्षात घेऊन जोगेश्वरीकरांतील जनतेसाठी तसेच वारकर्यांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी येणार्या विठ्ठल भक्तांना विठ्ठलाचे दर्शन घेता यावे यासाठी पंढरपुर येथील विठ्ठलाच्या मुर्तीची प्रतिकृतीही उभारण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे संगित संयोजन संगीत युवा रत्न सागर कांबळी करणार असून कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल म्हसकर करणार आहेत. जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर, माजी नगरसेवक बाळा नर यांच्या आयोजनाखाली दत्ताराम गोविंद वायकर स्मृती ट्रस्ट (रजि) व श्री इच्छापुर्ती गणेश मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शिवसेना व्यापार विभागाचे विभागप्रमुख अनुरुद्ध नारकर, जोगेश्वरी विधानसभा संघटक रविंद्र साळवी सहकार्य लाभले आहेत.
रिपोर्टर