Breaking News
जीवन.. एक प्रवास या काव्यसंग्रहाचे सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
सुप्रसिद्ध युवा कवी चेतन दाभोळकर यांच्या कविता वाचायला सुरुवात केल्यावर अगदी शेवटच्या पानापर्यंत काव्यरसिकांना खिळवून ठेवणारा 'जीवन.... एक प्रवास' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते खार येथे पार पडले. इंजिनिअर असलेले प्रसिद्ध युवा कवी चेतन दाभोळकर यांनि आतापर्यंत विविध विषयावर दर्जेदार कविता केल्या असून त्या रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.
जीवनाच्या रसरशीत घेतलेल्या अनुभवांचे विचारमंथन होऊन एक प्रकारची ऊर्जा प्राप्त होणारा काव्यसंग्रह असा या काव्यसंग्रहाचा उल्लेख करावा लागेल. शालेय जीवनापासून केवळ स्वानंदासाठी कविता रचणाऱ्या युवा कवी चेतन दाभोळकर यांच्या पाचशे कवितांपैकी प्रारंभिक बावन्न कविता काव्यरसिकांसाठी या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या असून त्यांनी काही शीर्षकगीते सुद्धा लिहिली आहेत. पुस्तकाचे प्रकाशन शर्वा प्रकाशनचे चंद्रशेखर दाभोळकर यांनी केले आहे. जीवनाचा प्रवास अधोरेखित केलेला जीवन...एका प्रवास काव्यसंग्रह काव्यरसिकांना प्रेरणादायी ठरून एक पर्वणीच असल्याचे प्रकाशक चंद्रशेखर दाभोळकर यांनी सांगितले.
मी शालेय जीवनापासून विविध विषयावर कविता केल्या असून आतापर्यंत पाचशे पेक्षा जास्त कविता केल्या आहेत. छंद म्हणून कविता करण्याचा असलेला मानस आता काव्यसंग्रह रुपी प्रकाशित होत असल्याचा आनंद फार मोठा असून यापुढे देखील विविध विषयावर कविता प्रकाशित करणार असल्याची माहिती सुप्रसिद्ध युवा कवी चेतन दाभोळकर यांनी दिली. या काव्यसंग्रह समारंभात त्याच्या सोबत त्यांचे संपूर्ण कुटुंबीय उपस्तित होते.
रिपोर्टर