Breaking News
बी.व्ही.सी.ट्रान्सपोर्ट कंपनीचे कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
बी.व्ही.सी.ट्रान्सपोर्ट कंपनीचे कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. कंपनीचे अधिकारी कामगारांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असून कामगारांना कामावरून काढण्यात येत असल्याने कामगारांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
बी.व्ही.सी.ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये काम करत असलेले शंभरपेक्षा जास्त कामगार गेली १५ ते २० वर्ष काम करत असून भारतीय कामगार कर्मचारी महासंघ या कामगार संघटनेचे सदस्य आहेत. महासंघ आणि व्यवस्थापनामध्ये गेल्या १५ वर्षात भरघोस पगार वाढीचे करार झालेले आहेत. मागील करार मार्च २०२० ला संपुष्टात आला. महासंघाकडून कंपनीला मागणी पत्र सादर केले. कोविड-१९ मुळे केंद्र आणि राज्य सरकार कडून मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्याचा फायदा घेवून कंपनीने पगारवाढ संदर्भात कुठलीही चर्चा केली नाही. काही कामगारांना तर २ महिने ब्रेक दिला. कामगारांनी विरोध न करता कंपनीला सहकार्य केले.
महासंघाने सुद्धा कंपनीला सहकार्य केले. जून २०२० मध्ये कंपनीचे काम पुन्हा बऱ्या पैकी सुरू झाले विशेष म्हणजे ही कंपनी भारत आणि परदेशात हिरे,ज्वेलरी ने- आण करण्याचे काम करत आहे. ते चांगल्या प्रकारे सुरू आहे. कंपनीने व्यावसायकदृष्ट्या चांगली वाढ केली असून उत्पन्नात देखील भरघोस वाढ झाली आहे. मात्र कंपनीचे अधिकारी कामगारांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहेत. काही कामगारांना त्यांनी काहीही कारण नसताना कामावरून काढून टाकले. त्यामुळे कामावरून कमी केलेल्या कामगारांची उपासमार होत आहे. महासंघकडून अनेकवेळा प्रयत्न करून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. कारण केंद्र सरकारचे मालक धार्जिणे कायदे येत असल्यामुळे सगळीकडे कामगारांचे नुकसानच होणार आहे. या प्रकारामुळे कामगारांमध्ये अशांतता , अस्वस्थता आणि निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. कंपनीच्या अधिकऱ्यांनी याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर १५ सप्टेंबर २०२१ रोजी बंगलोर येथे आयोजित केलेल्या प्रदर्शनामध्ये कुठल्याही प्रकारचे सहकार्य करणार नाही, असे कामगारांनी एकमताने ठरवले आहे .
रिपोर्टर