Breaking News
दुसऱ्या कसोटीत भारताचा न्यूझीलंडवर ३७२ धावांनी दणदणीत विजय
- कसोटीसह मालिकाही जिंकली
- न्यूझीलंड गेल्या ६५ वर्षांपासून मालिका विजयाच्या प्रतीक्षेतच
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला. मात्र मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळलेल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने सामन्याच्या सुरुवातीपासूनच चमकदार कामगिरी करून सामन्यावर वर्चस्व ठेवले. सोमवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी सकाळाच्याच सत्रात न्यूझीलंडच्या उर्वरित खेळाडूंना झटपट बाद करत ३७२ न्यूझीलंडवर धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने दोन कसोटी सामान्यांची मालिकाही ०-१ ने जिंकली. गेल्या ६५ वर्षांपासून न्यूझीलंड संघाला भारतीय संघाला कसोटी मालिका जिंकता न आल्याने न्यूझीलंड गेल्या ६५ वर्षांपासून मालिका विजयाच्या प्रतीक्षेतच आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात ३२५ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या न्यूजीलंच्या संघा डाव अवघ्या ६२ धावांत घडागडाला. त्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या डावात भारताच्या फलंदाजांनी ७ बाद २७६ धावांवर डाव घोषित करत न्यूझीलंड संघाला ५४० धावांचे आव्हान दिले, मात्र हे आव्हान न्यूझीलंडच्या संघाला पेलवता आले नाही. न्यूझीलंडच्या संघ दुसऱ्या डावात १६७ धावांमध्ये ऑलआऊट झाला. त्यामुळे भारताने मुंबई कसोटी ३७२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज सोमवारी तिसऱ्या दिवशी भारताने सामना पूर्णपणे आपल्या नियंत्रणात ठेवला होता. ५४० धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने काल दिवसअखेर ५ बाद १४० धावांपर्यंत मजल मारली होती. विजयासाठी न्यूझीलंडला दोन दिवसात ४०० धावांची आवश्यकता होती. तर भारताला पाच विकेट्सची गरज होती. मात्र न्यूझीलंड संघ आजच्या दिवसात अवघ्या २७ धावा बनवू शकला. अवघ्या २७ धावांमध्ये त्यांनी उर्वरित पाच फलंदाज गमावले.
न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात भारताच्या फिरकीची जादू पाहायला मिळाली. भारताचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने किवी कर्णधार टॉम लॅथमला अवघ्या ६ धावांत बाद करत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर अश्विनने विल यंग (२०) आणि रॉस टेलर (६) यांनाही पव्हेलियनचा रस्ता दाखवत न्यूझलंडला संकटात टाकले. त्यानंतर डॅरिल मिचेलने फटकेबाजी करत झुंज दिली, मात्र तोही ६० धावा करुन अक्षर पटेलची शिकार ठरला. त्यानंतर आलेला यष्टीरक्षक टॉम ब्लंडेल खातेही न उघडता धावबाद झाला. १२९ धावांमध्ये न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत परतला. मात्र टॉम ब्लंडेल बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचे फलंदाज हेन्री निकोल्स (३६) आणि रचिन रवींद्र (२) या दोघांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. दोघांनी ८ षटके खेळूना काढली. त्यामुळे न्यूझीलंडने दिवसअखेर ५ बाद १४० धावांपर्यंत मजल मारली.
हेन्री निकोल्स आणि रवींद्र आजच्या दिवसात भारतीय गोलंदाजांचा फार प्रतीकार करु शकले नाहीत. सकाळच्या सत्रात जयंत यादवने रचिनला पुजाराकरवी झेलबाद केले. त्यानंतर काईल जेमिसनलादेखील त्याने पायचित करत माघारी धाडले. पाठोपाठ टिम साऊथीलादेखील जयंतने त्रिफळाचित केले. दोघेही खातेदेखील उघडू शकले नाहीत. अखेर हेन्री निकोल्स याला रवींचंद्रन अश्विनने बाद केले. निकोल्स यांनी ४४ धावांचे योगदान देत बराच वेळ संघर्ष केला. भारताकडून या डावात रवीचंद्रन अश्विन आणि जयंत यादव या दोघांनी प्रत्येकी चार बळी घेतले. तर अक्षर पटेलला एक विकेट घेता आली.
१९५६ सालापासून न्यूझीलंड संघाचा हा १२ वा भारत दौरा होता. या दौऱ्यासह दोन्ही संघांमध्ये भारतात आत्तापर्यंत ३७ कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. ज्यामध्ये किवी संघ केवळ दोन कसोटी जिंकू शकला आहे, तर १५ कसोटी सामने गमावले आहेत. यावरून न्यूझीलंडचा भारतातील रेकॉर्ड किती वाईट आहे हे स्पष्ट होते. न्यूझीलंडने १९८८ मध्ये टीम इंडियाचा अखेरचा पराभव केला होता. न्यूझीलंडने भारतात कधीही कसोटी मालिका जिंकलेली नाही. गेल्या ६५ वर्षांपासूनची ही न्यूझीलंडविरोधातील विजयांची मालिका यंदादेखील कायम राखण्यात भारतीय संघाला यश आले आहे.
रिपोर्टर