Breaking News
महात्मा गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर एकमेकांचा आदर करणारे महापुरुष होते - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
महात्मा गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर एकमेकांचा आदर करणारे एकमेकांवर विश्वास असणारे महापुरुष होते, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले आहे.
उमरखेड येथे महात्मा गांधी आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते झाले लोकार्पण पार पडले. दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ गोलमेज परिषदेत इंग्रजांनी मान्य केले होते. मात्र महात्मा गांधी यांचे प्राण वाचविण्यासाठी आणि समाजाच्या हितासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधींसमवेत पुणे करार केला होता. त्यानुसार स्वतंत्र मतदारसंघाऐवजी दलितांना आरक्षण देण्याचे सर्वांनुमते मान्य होऊन आरक्षण संविधानात समाविष्ट करण्यात आले. तसेच जेंव्हा भारताच्या संविधान निर्मितीची वेळ आली तेव्हा महात्मा गांधी यांनी संविधानाच्या मसुदा समिती च्या अध्यक्षपदासाठी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सुचविले होते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी लढत होते तसेच भारताच्या सामाजिक स्वातंत्र्यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर लढत होते. दोन्ही महापुरुषांमुळे भारत घडला आहे. महात्मा गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर एकमेकांचा आदर करणारे एकमेकांवर विश्वास असणारे महापुरुष होते, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले आहे.
यावेळी माजी मंत्री मदन येरावर, उमरखेडचे नगराध्यक्ष नामदेव ससाणे, भाजप जिल्हा अध्यक्ष नितीन भुतडा, रिपाइंचे ज्येष्ठ नेते सुधाकर तायडे, मोहन भोयर, रिपाइं यवतमाळ जिल्हा अध्यक्ष महेंद्र मानकर आदी मान्यवर उपस्थित होते. संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण ना.रामदास आठवले आणि पूज्य भिक्खू संघाच्या हस्ते करण्यात आले.
रिपोर्टर