Breaking News
राष्ट्रीय उद्यानातील रहिवासी मूलभूत सुविधांपासून वंचितच
- पाड्यांवर अंधार
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील नागरिक वीज, पाणी स्वच्छतागृहे अशा मूलभूत सुविधांपासून अद्याप वंचितच आहेत. या उद्यान मधील मागाठाणे येथील नागरिकांना घरगुती दराने वीज पुरवठा करण्याची घोषणा अलिकडेच केली होती. यामुळे आता जंगलातील पाड्यांवर राहणाऱ्या आदिवासींनीही आपल्यापर्यंत वीज केव्हा पोहोचणार, अशी विचारणा सुरू केली आहे.
मुंबईमध्ये आदिवासी पाड्यांमध्ये राहूनही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत, मात्र निवडणुका आल्यावर मतदार म्हणून कर्तव्य बजावणे अपेक्षित असते, अशी प्रतिक्रिया बिरसा मुंडा आदिवासी श्रमिक संघटनेच्यावतीने देण्यात आली आहे. उद्यानातील आदिवासी पाड्यांना मूलभूत सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी यंदा २६ जानेवारी रोजी उपोषणही करण्यात आले होते.
वीज, पाणी स्वच्छतागृहे या सुविधांशिवाय वर्षांनुवर्षे आदिवासींना या विभागात राहावे लागत आहे. वन हद्दीतील इतर नागरिकांप्रमाणे पाड्यांवरील आदिवासींच्या मूलभूत सुविधांचाही प्रश्न त्यांचा जीवनप्रवाह लक्षात घेऊन सोडवावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
रिपोर्टर