Breaking News
जिवाची बाजी लावून प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या महिला जवान सपना गोलकर यांचे कौतुक
- युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारत यांच्यातर्फे सत्कार
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
रेल्वे स्थानकावर ड्युटी करताना आपल्या जिवाची पर्वा न करता दोनवेळा प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या आरपीएफच्या महिला जवान सपना गोलकर यांचे कौतुक करण्यात येत आहे. युनिव्हर्सल ह्यूमन राईट्स काऊन्सिल भारत या संघटनेने याबद्दल या धाडसी कॉन्स्टेबलची भेट घेऊन त्यांच्या कामाची प्रशांसा करत त्यांचा सत्कार केला.
स्टँडहर्स्ट रेल्वे स्थानक येथे २३ ऑक्टोबर २०२१ रोजी रेल्वे स्थानकातील लोकलमध्ये चढताना एका ५५ वर्षीय महिलेचा तोल गेला. यावेळी त्याठिकाणी ड्युटीवर असलेल्या सपना गोलकर यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या जिवाची पर्वा न करता वाचवले. या घटनेनंतर पुन्हा अशीच दुसरी घटना २१ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री ८:०० वाजण्याच्या सुमारास घटली. भायखळा स्थानकात ऑन ड्यूटी आरपीएफ महिला जवान सपना गोलकर यांनी पुन्हा लोकल मध्ये चढताना एका ४० वर्षीय महिलेचा जीव वाचवला. दोन्हीही प्रसंगी त्यांनी अगम्य साहस दाखऊन दोन महिलांचे प्राण वाचवले. या साहसाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
युनिव्हर्सल ह्यूमन राईट्स काऊन्सिल भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.तरुणजी बकोलिया, महिला राष्ट्रीय अध्यक्षा डॉ.सुमनजी मौर्य यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जितेंद्र दगडू सकपाळ, महाराष्ट्रप्रदेश अध्यक्षा सुवर्णाताई कदम यांच्या सुचनेनुसार आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष अमोल वंजारे यांच्या अध्यक्षतेने मार्गदर्शनानुसार मुंबई पदाधिकारी यांनी सपना गोलकर यांचा आणि स्टेशन व्यवस्थापक विनायक शेवाळे यांचा नुकताच शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व संघटनेचे कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.
त्याप्रसंगी महाराष्ट्र महिला संघटनमंत्री सुजाता मंगेश सावंत, मुंबई महिला महासचिव पूजा दळवी, मुंबई सचिव वसुधा वाळुंज, सचिव घाटकोपर विधानसभा महेश प्रकाश आंब्रे, घाटकोपर ब्लॉक प्रेसिडेंट प्रकाश तुकाराम आंब्रे, दिनेश पवार सदस्य, नीता कडलग सदस्य, योगेश माळवे, मंगेश जगन्नाथ सावंत, अमोल कसर आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
रिपोर्टर