Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
थोडक्यात महत्वाची बातमी
एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासा बरोबरच वक्तशीर बस सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली एसटीच्या "स्मार्ट बसेस" घेण्यात येणार.
सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या "स्मार्ट बस" येणार. नवीन लालपरी सह येणाऱ्या सर्व बसेस मध्ये ए. आय तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे, जी.पी.एस. तंत्रज्ञान एल.ई.डी. टीव्ही, वाय-फाय, चालक ब्रेथ ॲनालाइज यंत्रणा, याबरोबरच चोरी- प्रतिबंध तंत्रज्ञानवर आधारित (anti- theft technology ) बस लॉक सिस्टम असे आधुनिक तंत्रज्ञान एकात्मिक पद्धतीने लावण्यात येणार : प्रतापसर नाईक ( महाराष्ट्रराज्य परिवहन मंत्री )
मंत्रालय : मुंबई.
भविष्यात एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासा बरोबरच वक्तशीर बस सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली एसटीच्या "स्मार्ट बसेस" घेण्यात येणार आहेत. याबाबत नव्या 3 हजार बसेस खरेदीच्या अनुषंगाने बस बांधणी कंपन्यांची बैठक पार पाडली. या बैठकीला एस.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व संबंधित खाते प्रमुखांसह बस बांधणी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नवीन लालपरी सह येणाऱ्या सर्व बसेस मध्ये ए. आय तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे, जी.पी.एस. तंत्रज्ञान एल.ई.डी. टीव्ही, वाय-फाय, चालक ब्रेथ ॲनालाइज यंत्रणा, याबरोबरच चोरी- प्रतिबंध तंत्रज्ञानवर आधारित (anti- theft technology ) बस लॉक सिस्टम असे आधुनिक तंत्रज्ञान एकात्मिक पद्धतीने लावण्यात येणार असून या बसेस प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि आरामदायी असतील.
स्वारगेट बसस्थानकावरील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेला अत्यंत महत्त्व दिले जाणार असून, प्रवासात बसेस मध्ये प्रवाशांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात येणार असून, चालकाच्या गाडी चालवण्याच्या पद्धतीवर देखील या कॅमेराचा "तिसरा डोळा" लक्ष ठेवून असणार आहे. तसेच बसस्थानक व परिसरामध्ये "पार्किंग" मध्ये उभ्या असलेल्या बसेस देखील पूर्णतः बंद राहतील अशी यंत्रणा बसमध्ये बसविण्यात येणार आहे.
सध्या तापमान वाढीमुळे एसटी बसेसला आग लागण्याच्या घटना घडत आहेत. या आगीला प्रतिबंध करण्यासाठी फोम बेस आग प्रतिबंधक यंत्रणा लावण्यात येणार आहे.
रिपोर्टर