Breaking News
पगारवाढ मागणी संदर्भातील यशस्वी चर्चेमुळे बी.वी.सी ट्रान्सपोर्ट कामगारांचे आंदोलन स्थागित
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
पगारवाढ द्यावी या मागणीसाठी बी.वी.सी. सेक्युरिटी ट्रान्सपोर्ट या कंपनीतील कामगार आंदोलनाच्या पावित्र्यात होते, मात्र आता पगारवाढ मागणी संदर्भात यशस्वी चर्चेमुळे बी.वी. सी ट्रान्सपोर्ट कामगारांचे आंदोलन स्थागित झाले आहे.
गणेश आगमनाच्या सुमुहूर्तावर बी.वी.सी. सेक्युरिटी ट्रान्सपोर्ट कंपनी आणि भारतीय कामगार कर्मचारी महासंघ यांच्यात वडाळा मुंबई कार्यालयात बैठक झाली. सदर बैठकीमध्ये प्रलंबित असलेल्या पगारवाढ मागणी संदर्भात सविस्तर चर्चा झाली. या चर्चेमध्ये एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या एक वर्षासाठी काही ठराविक रक्कम पगारात तातडीची वाढ म्हणून देण्यात आली. सध्याची कोविड- १९ मुळे निर्माण झालेली परिस्थिती सुधारल्या नंतर एप्रिल २०२२ मध्ये पुन्हा कंपनीचे अधिकारी - अध्यक्ष - एचआर बॉबी जोसेफ आणि मुख्य व्यवस्थापक महेन्द्र पलसोकर, भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सचिव दिलीप दादा जगताप, सचिव प्रकाश शिंदे, बी.वी.सी कामगार युनिट प्रतिनिधी प्रमोद आंब्रे, नंदकिशोर हाडके, मंगेश चव्हाण, किरण बागवे, सम्राट भाटकर, पराग जाधव, किशोर भगत, सूर्याजी पाटील, रामदास महाडिक, महेश पवार आदी एकत्र बसून प्रलंबित पगारवाढ मागणीपत्र आणि इतर प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून भा.का. क.महासंघ आणि कंपनी प्रशासन या दोघांच्या सहमतीने योग्य निर्णय घेतला जाईल, असे ठरविले .
१५ सप्टेंबर २०२१ पासून बंगलोर येथे सुरू होणाऱ्या जागतिक प्रदर्शनात भारतात आणि इतर देशात असलेले कंपनीचे अस्थित्व, नाव याला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये याची काळजी घेऊन कामगारांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. १५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जागतिक प्रदर्शनात कामगारांनी व भा.का.क महासंघ या युनियनने संपूर्ण सहकार्य करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे बी.वी.सी प्रशासनाने भा.का.क महासंघाचे आणि कामगारांचे खास आभार मानले आहेत .
रिपोर्टर