Breaking News
गरजूंच्या मदतीसाठी विभगीय स्वयंसेवक योद्ध्यांची ट्रस्टतर्फे होणार नियुक्ती
- नागरिकांनी सहभाग नोंदवण्याचे मॅनपॉवर सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे आवाहन
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
कोरोनाकाळामध्ये मानवजातीवर जे संकट ओढवले त्यात त्यांची अमर्याद हानी झाली. अजूनही या हानीतून सावरण्याचे काम अद्याप सुरू आहे. यासाठी काही सेवाभावी संस्थांनी विविध उपक्रम राबवत मदतही केली आहे, मात्र अद्याप काही भागांमध्ये गरजूंच्या ही मदत पोहचवता आलेली नाही. यामुळे प्रत्येक गरजूंपर्यंत मदत पोहचवण्यासाठी मॅनपॉवर सेवा चॅरिटेबल ट्रस्टने पुढाकार घेतला असून ट्रस्टने सर्व विभागांमध्ये विभागीय स्वयंसेवक योद्धा यांची नेमणूक करण्याचे ठरवले आहे.
ज्या व्यक्तींना या सामाजिक उपक्रमामध्ये स्वेच्छेने काम करण्याची इच्छा असेल त्यांनी आपली नावे द्यावीत असे आवाहन मॅनपॉवर सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे. यासाठी ७४९८११४२६८ / ८२८६४२२४२२ या क्रमांकांवर संपर्क साधावा असे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले. भविष्यात येणा-या भौगोलिक, सामाजिक, वैद्यकीय, आर्थिक आणि नैसर्गिक संकटावर विभागवार मात करण्यासाठी या स्वयंसेवकांची नियुक्ती केली जाणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले. ज्या व्यक्तीना या सामाजिक उपक्रमामध्ये स्वेच्छेने विनावेतन काम करण्याची इच्छा असेल अशा व्यक्तींनी पुढे येऊन आपली नावे ट्रस्टकडे नोंदवावीत असे ट्रस्टतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
रिपोर्टर