Breaking News
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे अवघ्या चाळीसाव्यावर्षी हृदय विकाराच्या झटक्याने निधन
- चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांकडून हळहळ
मुंबई : लोकवार्ता टाइम्स टीम
बिग बॉस १३ चा विजेता आणि छोट्या पडद्यावर आपल्या दमदार अभिनयाने छाप उमटवणारा अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ४०व्या वर्षी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला. सिद्धार्थच्या निधनानंतर सर्वांनच धक्का बसला असून चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी सिद्धार्थने काही औषधे घेतली होती. त्यानंतर गुरूवारी सकाळी त्याला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी सिद्धार्थचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे रूग्णालयाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. सोशल मीडियावरून अनेकजण सिद्धार्थला श्रद्धांजली वाहत आहेत.
सिद्धार्थ छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमध्ये दमदार अभिनय केला आहे. यामुळे सिद्धार्थ छोट्या पडद्यावर अतिशय लोकप्रिय अभिनेता आहे. 'बालिका वधू' या मालिकेतून त्याने अनेकांची मने जिंकली होती. या मालिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली होती. त्याने रिअॅलिटी शो 'बिग बॉस १३' मध्ये सहभाग घेतला होता. या सिझनचा तो विजेताही ठरला होता. यानंतर त्याने 'खतरों के खिलाडी' या शोच्या सातव्या सिझनमध्येही सहभाग घेतला होता.
डिसेंबर १९८० साली सिद्धार्थचा जन्म मुंबईत झाला. त्याने एक मॉडेल म्हणून करिअरला सुरूवात केली होती. २००४ साली त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर २००८ मध्ये त्याने 'बाबुल का आंगन छूटे' या मालिकेत काम केले होते. आपल्या लोकप्रिय अभिनेत्याच्या निधनानंतर चित्रपटसृष्टी आणि त्यांच्या चाहत्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
रिपोर्टर