Breaking News
नायगावमध्ये आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई :लोकवार्ता टाइम्स
भारतीय जनता पार्टी दक्षिण मध्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष गजेंद्र भगवान धुमाळे आणि भाजप प्रभाग क्रमांक २०० चे अध्यक्ष समीर भगवान कांबळे यांनी नायगाव येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये दातांची तपासणी, ब्लडप्रेशर तपासणी, हाडांची कमतरता, अक्युप्रेशर द्वारे उपचार तसेच डायबीटीस आणि शुगरची तपासणी करण्यात आली. तसेच पूर्ण शरीराची तपासणी करून नागरिकांना मोफत औषध वाटप करण्यात आले.
या समारंभांमध्ये भारतीय जनता पक्षाचे दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष राजेश शिरवाडकर उपस्थित होते. त्यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. या शिबिराचे उद्घाटन विभागाचे आमदार कालिदास कोळंबकर यांच्या हस्ते करण्यात आले. गजेंद्र धुमाळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने केलेल्या या आरोग्य शिबिराला दिल्या. तसेच या शिबिरात औषधें देखील मोफत देण्यात आली असून दातांची पूर्ण तपासणी आणि स्वच्छता देखील मोफत करून दिल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर खरंच एक सोजवळ हास्य उमटले याचा मला खूप आनंद आहे, असे धुमाळे यावेळी म्हणाले. तसेच यापुढे देखील आपण असेच कार्य करत राहाल अशी अपेक्षा बाळगतो अशी माहिती आमदार कालिदास कोळबकर यांनी या कार्यक्रमात दिली. या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपोर्टर