Breaking News
रेल्वेचे तिकिट आता फक्त एका क्लिकवर
- स्कॅन करा आणि तिकीट मिळवा
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
रेल्वेचे तिकिट मिळवण्यासाठी मुंबईकरांना आता लांबच लांब रांगेत थांबण्याची गरज भासणार नाही. स्कॅन करा, तिकिट मिळवा ही नवी यंत्रणा आता विकसित करण्यात आली आहे.केंद्रीय रेल्वे सूचना प्रणालीकडून अर्थात क्रिसकडून नवी यंत्रणा विकसीत करण्यात आली आहे. ज्यामुळे मुंबईकरांचा वेळही वाचणार आहे.
स्कॅन करा, तिकिट मिळवा या नविन यंत्रणेमुळे मुंबईकरांना लोकलचं तिकिट अवघ्या एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. एटीव्हीएम मशिनवरील बारकोड आपल्या यूपीआय ॲपद्वारे स्कॅन करून आपल्याला लोकलचे तिकिट काढता येणार आहे. सध्या या योजनेची वेगवेगळ्या पातळीवरून तपासणी सुरू आहे. ही तपासणी प्रक्रिया एकदा पूर्ण झाली की एटीव्हीएम मशिनमध्ये ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. तर ही नवी यंत्रणा सुरू झाली तरी मुंबईकरांना जुन्या पद्धतीनेही तिकिट काढता येणार असल्याची माहिती वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असला तरी गर्दी टाळण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यात तिकिट मिळवण्यासाठीची गर्दी काही नवी नाही. त्यामुळे तिकिटाच्या खिडकीवरील गर्दी कमी करण्यासाठी डिजिटल व्यवहारावर भर देत या यंत्रणेचा विकास करण्यात आला आहे. यामुळे मुंबईकरांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार आहे.
रिपोर्टर