Breaking News
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
मुंबईतील अभ्युदयनगरच्या कलादालनात स्वराज्य फाउंडेशनच्यावतीने "चला बाप्पा घडवूया" या उपक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये चिमुकल्यांनी आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्त्या साकारल्या. या उपक्रमावेळी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा नवनिर्मितीचा मातीमधून मूर्ती घडवतानाचा अवीट,अविस्मरणीय आनंद उपस्थितांना अनुभवायला मिळाला.
लॉकडावूनच्या भीषण काळात सतत ऑनलाइन राहून शिक्षण घेताना मुले,पालक शिक्षक ही कंटाळली होती. या घुसमट करणाऱ्या मानसिकतेतून बाहेर पडून नवसर्जनाचा निकोप आनंद देण्यासाठी नवनवीन संकल्पना घेऊन त्या यशस्वीपणे प्रत्यक्षात आणणारे युवा उद्योजक उदय पवार यांनी हा मूर्ती घडवण्याचा उपक्रम राबविला. या उपक्रमात त्यांचे सहकारी पत्रकार राजेंद्र साळसकर, अभ्युदय कलादालनाचे सूत्रसंचालक कवी गुरुदत्त वाकदेकर, छायाचित्रकार आणि सुप्रसिद्ध गायक अशोक पवार उद्योजक अविनाश जगताप,नयना हडकर, दिव्या कदम ,वैष्णवी ,प्रथमेश सहकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. या उपक्रमाला बच्चे कंपनीकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. अतिशय सुंदर अशा गणरायाच्या मूर्त्या त्यांनी साकारल्याच यासह अनेकांनी उत्स्फूर्तपणे गणरायाचे स्तवन करणारी गाणी गाऊन कार्यक्रमात अधिक गहिरे रंग भरले.या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध आर्टिस्ट आणि व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर परीक्षक म्हणून उपस्थित होते. विजयी स्पर्धकांना नगरसेवक दत्ता पोंगडे,डॉ प्रागजी वाझा यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
रिपोर्टर