Breaking News
वांद्रे (पश्चिम) विभागात १५, १६ डिसेंबर, २०२१ रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे माहीम खाडी येथील पश्चिम रेल्वे पुलाखालून जाणाऱ्या तानसा पूर्व मुख्य जलवाहिनीवर कॅपिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम बुधवार, दिनांक १५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजेपासून गुरुवार, दिनांक १६ डिसेंबर २०२१ रोजी रात्री १० वाजेदरम्यान करण्यात येणार असल्याचेर माहिती मुंबई महापालिकेच्यावतीने देण्यात आली.
या कामामुळे बुधवार, दिनांक १५ डिसेंबर २०२१ सकाळी १० वाजेपासून गुरुवार, दिनांक १६ डिसेंबर २०२१ रोजी रात्री १० वाजेदरम्यान संपूर्ण वांद्रे (पश्चिम) म्हणजेच एच / पश्चिम विभागाला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. सबब, संबंधित नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी अगोदरच्या दिवशीच खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा पुरेसा साठा करावा व काटकसरीने पाणी वापरुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
रिपोर्टर