Breaking News
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी राज्यपाल, उप मुख्यमंत्री, महापौरांनी केले अभिवादन
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाणदिनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उप मुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळातील सदस्य; तसेच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज ०६ डिसेंबर २०२१ रोजी चैत्यभूमी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री श्री. दिलीप वळसे-पाटील, सामाजिक न्यायमंत्री श्री.धनंजय मुंडे, वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, सामाजिक न्याय राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे, उप महापौर अँड.सुहास वाडकर, सभागृह नेत्या श्रीमती विशाखा राऊत, महापालिका आयुक्त डाॅ. इक्बालसिंह चहल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर ), डॉ. संजीवकुमार, उप आयुक्त (परिमंडळ -२) हर्षद काळे, 'जी उत्तर' विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.
रिपोर्टर