Breaking News
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील काम सुरू
पुणे : लोकवार्ता टाइम्स
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात पुणे विद्यापीठ चौकातील ड्रेनेज, पाणी, वीज वाहिन्यांसह उपयुक्त सेवावाहिन्या स्थलांतरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रोचे खांब टाकण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.
या प्रकल्पासाठी पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल एक वर्षांपूर्वीच पाडल्याने सेनापती बापट रस्ता, औंध, बाणेर येथून विद्यापीठ चौकात येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते. दरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पर्यायी मार्गांची पाहणी पीएमआरडीए, पोलीस, महापालिका आणि टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. यावेळी येत्या दोन दिवसात प्रायोगिक तत्त्वावर त्यांची अंमलबजावणी सुरू करावी. तसेच त्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्यानंतर आवश्यक त्या सुधारणा कराव्यात असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाचे काम कधी सुरू होते याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
रिपोर्टर