सताधरांचा खेळ गेले काही दिवस महाराष्ट्र राज्यात पाहायला मिळत आहे जनतेच्या मतावर, विश्वासावर पाणी फेरण्याचे काम राजकीय नेते करीत आहेत, मागील निवडणुका पहिल्या असता फक्त ४०% मतदान होत असून नोटा हा पर्याय जनते निवडला यातून सर्व राजकीय पक्षांनी बोध घ्यायला हवा होता. पण प्रत्यक्षात नेते मंडळी आपल्याच धुंदीत असून जनतेला दुर्लक्ष करीत आहे. जनता राजकीय पक्षांच्या नेत्यांना आता कंटाळले असे दिसुन येते सातारा जिल्हा येथील धक्कादायक निकालातून आत्मचिंतन करण्याची राजकीय पक्षांच्या नेत्यांना गरज आहे.
राज्यात ११६६ ग्रामपंचायतींपैकी १०७९ ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले. विविध जिल्ह्यांमधील ८७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. मात्र सातारा जिल्ह्यातील सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातील भणंग ग्रामपंचायतीच्या निकालानं संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलंय. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्त्वाला मानणाऱ्या पॅनलला नाकारत भणंग गावातील मतदारांनी स्थानिक अपक्षांच्या हाती सत्ता दिली आहे. भणंग ग्रामपंचायतीचा हा निकाल सर्व राजकीय पक्षांसाठी धक्कादायक मानला जात आहे.
साताऱ्यातील जावली तालुक्यातील भणंग ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या समर्थकांच पॅनल आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांच्या पॅनलला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. ग्रामस्थ मतदारांनी सर्व अपक्षांना निवडून दिले आहे. त्यामुळं संपूर्ण राज्यात भणंग गावचा निकाल लक्षवेधी ठरत असून जनतेने राजकीय पक्षांना आणि नेत्यांना नाकारले आहे.
सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील भणंग ग्रामपंचायतीत अपक्ष उमेदवार निवडून आल्याने भाजप आणि राष्ट्रवादीचं स्थानिक नेत्यांचं पॅनल पराभूत झालं आहे. पक्षाची आणि स्वतःच अस्तित्व वाचवण्यासाठी भणंगचे विजयी उमेदवार हे आम्हाला मानणारे असल्याचा दावा स्थानिक भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते करीत आहे. त्यामुळं विजयी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या भूमिकेकडे सर्व राजकीय पक्षाचे लक्ष लागलंय. सरपंचपदी विजयी झालेले अपक्ष उमेदवार गणेश साईबाबा जगताप हे दीपक पवार यांचे समर्थक होते. दीपक पवार हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यांच्या समर्थकानं अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या सर्व प्रकारातून येत्या महानगर पालिका निवणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी बोध घेणे गरजेचे आहे. अन्यथा येत्या निवडणुकीत जागरूक झालेली जनता नवीन मार्ग निवडतील आणि राजकीय नेत्यांना त्यांची जागा दाखवतील.
रिपोर्टर