Breaking News
गिरगावात रंगणार बहारदार मराठी, हिंदी गाण्यांचा ओर्केस्टा
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
७ रिदम्स आणि युवा आत्मनिर्भर चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न गानकोकिळा कै. लतादीदी मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बहारदार मराठी आणि हिंदी गाण्यांचा ओर्केस्टाचे आयोजन रविवार, दिनांक २० मार्च, २०२२ रोजी संध्याकाळी ७. ३० वाजता साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक अलोक काटदरे, आनंद आरोळकर, अमर आर्टे, चांग, सर्वेश मिश्रा, किरणकुमार, हरीश भट, दीप्ती पिंपुटकर, सपना सुधीर, गौरी त्रिवेदी ( प्रसिद्ध फायनलिस्ट इंडियन आयडॉल), प्रसिद्ध संगीतकार अजय मदनजी आणि पार्श्वगायक दिलराज कौर आणि विनायक शिंदे आपली गाणी सादर करणार आहेत.
तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा मुंबई समाज रत्ना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार अरविंद सावंत, आमदार यामिनी जाधव, आमदार मंगलप्रभात लोढा, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, संगीतकार कौशल इनामदार उपस्तित राहणार आहेत. तरी इच्छुक समाजसेवकांनी आणि रसिकप्रेक्षकांनी तिकिटासाठी 8828356471 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजक मीनल लाड यांनी केले आहे.
रिपोर्टर