कवी अनंत धनसरे यांना राज्यस्तरीय काव्यरत्न पुरस्कार
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
वैश्विक जीवनमुल्यांचं सुत्त गाणारा कवी अनंत धनसरे गेली पस्तीस वर्ष स्वतंत्र , समता , बंधुत्व हि मुल्य समाज मनात रूजवण्या साठी आपल्या कवितेच्या माध्यमातून वस्ती वस्ती जागवीत आहे . विविध वृत्तपत्रांमधून सातत्त्याने लेखन करीत आहेत. त्यांचा " शोध " हा कविता संग्रहही प्रकाशित झाला आहे.स.सु.स.सामाजिक संस्था आणि लाख मोलाच्या कविता काव्यमंच , या संस्थांनी नुकतेचं त्यांना " काव्यरत्न " पुरस्कार देवून सन्मानित केले आहे .
कल्याण येथे संपन्न झालेल्या ह्या पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष डाॅ.खंडू माळवे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.शुक्राचार्य गायकवाड , डाॅ.चंद्रशेखर भारती , काशिनाथ जाधव , संजीवनी राजगुरू , राजरत्न राजगुरू आदी उपस्थित होते.
वरील संस्थेच्यावतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी संस्थेचे अध्यक्ष दिलिपकुमार सरस्वती सुदामराव चव्हाण , यांच्या एकसष्ठीपुर्ती निमित्त सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कवयित्री सुनिता काटकर , कवी अनिल भालेराव, कवी वसंत हिरे, कवी विनोद गायकवाड आदी कवींनाही विविध पुरस्काराने गौरविण्यात आले .
रिपोर्टर