Breaking News
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे कल्याण रेल्वे स्थानकात वाचला गर्भवती महिलेचा जीव
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
कल्याण रेल्वे स्थानकामध्ये आरपीएफ जवानाने दाखलवेल्या सतर्कतेमुळे एका गर्भवती महिलेचा जीव वाचला. या जवानाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एक मोठी दुर्घटना टळली. चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करणारी महिला ट्रेनखाली जाणार इतक्यात जवानाने धाव घेत महिलेचा जीव वाचवला. रेल्वे स्थानकावरील ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
https://twitter.com/ANI/status/1450223351952117760?s=20
सोमवारी कल्याण रेल्वे स्थानकात ही घटना घडली. सीसीटीव्हीत दिसत आहे त्याप्रमाणे एक्स्प्रेस फलाटावर थांबली होती. यावेळी आरपीएफ कॉन्स्टेबल एस.आर.खांडेकर तिथेच उभे होते. एक्स्प्रेस सुरु झाल्यानंतर महिला चुकीच्या पद्धतीने उतरत असल्याचं लक्षात येता खांडेकर यांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान महिला तोल जाऊन खाली पडली असता खांडेकर यांनी तिला तात्काळ बाजूला खेचत ट्रेनखाली जाण्यापासून वाचवले.
ट्रेन क्रमांक 02165 मध्ये सोमवारी संध्याकाळी 06:05 वाजता कल्याण स्थानकावर, चंद्रेश नावाचा प्रवासी त्यांच्या गर्भवती पत्नी वंदनासोबत ट्रेनमध्ये चढला. त्याला गोरखपूर एक्सप्रेस मध्ये प्रवास करायचा होता. पण जेव्हा ट्रेन सुरू झाली तेव्हा त्याला कळले की, आपण ज्या ट्रेनमध्ये बसलो ती आपली नाही. त्यामुळे चालत्या ट्रेनमधून त्यांनी उतरण्याचा प्रयत्न केला असता, तोल जाऊन गर्भवती महिला खाली पडली. तेव्हा ड्युटीवर असलेले कॉन्स्टेबल एस.आर. खांडेकर यांनी गर्भवती महिलेला ताबडतोब प्लॅटफॉर्मच्या दिशेने बाहेर ओढले आणि महिलेचे प्राण वाचवले. आपल्या सतर्कतेमुळे महिलेचा जीव वाचवणाऱ्या जवानाचे कौतुक केले जात आहे.
रिपोर्टर