Breaking News
घरेलू कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदान येथे धरणे आंदोलन !
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
घरेलू कामगार महिलांना श्रमिक म्हणून दर्जा मिळावा या सह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समितीच्या वतीने ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात आले.या वेळी महाराष्ट्र राज्यातील अनेक भागांतून हजारोंच्या संख्येने घरकामगार महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ( I L O) ने सर्व देशांच्या उपस्थितीत घरेलू कामगारांना श्रमिक म्हणून दर्जा व अधिकार आणि सामाजिक सुरक्षेची हमी देणारा कायदा करावा असा ठराव केला होता. त्याला भारत सरकारने संमती दिली परंतु कारवाई केली नाही.महाराष्ट्र सरकारने २०११ साली कायदा करून पाऊल उचलले असले तरी किमान वेतन , पेन्शन , वैद्यकिय सुविधा इत्यादीसारखे लाभ दिले नाहीत. त्याच प्रमाणे घरेलू कामगार कल्याणकारी मंडळ कायद्याची अंमलबजावणी केली नाही. असे महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समितीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हणंटले आहे.
घरेलू कामगार कल्याणकारी मंडळाला विषेश नीधीचे प्रावधान करण्यात यावे. २०११ ते डिसेंबर २०२१ पर्यंतच्या सगळ्या घरेलू कामगारांना कोव्हिड काळात घोषित केलेली रक्कम ज्यांना निधी मिळाला नाही त्यांना त्वरीत मिळावा . संत जनाबाई योजना इतर योजना आणि नियमन त्वरित जाहिर करावीत , तसेचं हायकोर्टाच्या आदेशानुसार तात्काळ मंडळाच्या त्री पक्षीय बोर्डाची स्थापना करावी , प्रत्येक घरेलू कामगारांचे सर्वेक्षण राज्य स्तरावर करण्यात यावे . नोंदणी साठी स्वतंत्र कार्यालये उभारण्या यावेत आदी मागण्यांचे निवेदन या वेळी राज्य सरकारला देण्यात आले. राज्य भरातील अनेक संघटनां सहभागी असलेल्या महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समितीने मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे.
रिपोर्टर