Breaking News
चेंबूर नाका मनपा शाळा संकुलाचे छंदवर्ग शिबिर संपन्न
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
चेंबूर नाका मनपा शाळा येथे दिनांक 13 एप्रिल 27 एप्रिल या कालावधीमध्ये विविध छंद वर्गाचे आयोजन करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने तायकांडो खेळ प्रात्याशिक समूहगान , शालेय बँड ,बिगुल ढोल ,साईड ड्रम ट्रँगल यांचे प्रशिक्षण इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिले यामध्ये 118 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.छंद वर्गाच्या सांगता सोहळ्यात तायकोंडो खेळाचे प्रत्याषिक विद्यार्थ्यांनी दाखविले,तसेच सामूहिक रित्या समुहगान गायले,शालेय बँड,बासरी च्या तालावर मुलांनी कवायत केली व सर्वांना मंत्रमुगध केले.
प्रतीक्षा खोपडे हिला उत्कृष्ट शिबिरारठी म्हणून गौरविले गेले.मुलाच्या कला व क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी गेली 22 वर्ष या शाळेचे शारीरिक शिक्षण शिक्षक डॉ जितेंद्र लिंबकर या शिबिराचे आयोजन करत आहेत.गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात देखील ऑनलाइन छंद वर्गाचे आयोजन केले होते. या समारोप प्रसंगी शारीरिक शिक्षण उपविभागाचे वरिष्ठ पर्यवेक्षक राजेश गाडगे,कनिष्ठ पर्यवेक्षक सूनीलदत्त माने,नगरसेवक महादेव शिवगण,नगरसेविका आशा मराठे, हे प्रमुख अतिथी उपस्थित होते.सर्व विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले,राष्ट्रीय खेळाडू व आंतरराष्ट्रीय पंच ज्योती पगारे व अजय गायकवाड यांनी तायकोंडी खेळाचे मार्गदर्शन केले, पले अँड शाइन संस्थेचे संस्थापक सार्थक वाणी यांनी सहभागी मुलांना अल्पोहार व प्रमाणपत्र दिले.सायली काजरोळकर यांनी समुहगणाचे उत्कृष्ट मार्गदर्शन मुलांना केले व एकसुरात ते सर्वांनी समुह गीत गायले.कार्यक्रमाचे दमदार सूत्र संचालन उज्वला दारोळे यांनी केले व सर्व उपस्थित पाहुणे व पालकांचे आभार मुख्याध्यापक विठ्ठल माने यांनी मानले. अनुरूपा राजवाडे, मालन म्हात्रे,निपा मॅडम,सोनाली नाईक,योगेश मरकाम,चव्हाण,वीरेंद्र गुप्ता,यशवंत पवार,केशव बोरकर,चंद्रकांत घोडेराव यांचे विशेष सहकार्य लाभले.सोहळ्याची सांगता पसायदानाने झाली.
रिपोर्टर