Breaking News
सिंधुदुर्गातील सर्व एस.टी.डेपोत लॉटरीचे स्टॉल लावण्यास परिवहन विभागाचा हिरवा कंदील
- शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेच्या पाठपुराव्याला यश
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
राज्यातील सर्व एस.टी.डेपोमध्ये महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रीचे स्टॉल लावण्यास मंजुरी देण्यात यावी यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे शिवसेना लॉटरी विक्रेता सेना आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यामार्फत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. परिवहन विभागाने यास अखेर
हिरवा कंदील देत पहिल्या टप्प्यात सिंधुदुर्ग मधिल सर्व एस.टी.डेपोत अधिकृतरित्या लॉटरी विक्रीचे स्टॉल लावण्यास परवानगी दिली. तसेच येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील सर्व एस.टी.डेपोमध्ये लॉटरी विक्रीचे स्टॉल लावण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे ही परिवहन विभागाने स्पष्ट केले असल्याचे लॉटरी विक्रेता सेनेचे अध्यक्ष मनोज वारंग यांनी सांगितले.
एस.टी.डेपोमध्ये प्रवाशांची मोठी वर्दळ असते. या प्रवाशांना लॉटरी तिकीटे डेपोमध्ये खरेदी करण्यास उपलब्ध झाली तर प्रवाशी ही तिकिटे खरेदी करू शकतात. या स्टॉलमधून राज्य लॉटरीची तिकीटांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास मदत होईल. शिवाय शेकडो बेरोजगार तरुणांना रोजगाराचे साधनही उपलब्ध होऊ शकेल असे आमदार डॉ. किणीकर तसेच लॉटरी सेनेचे अध्यक्ष मनोज वारंग, सरचिटणीस सिद्धेश पाटील आणि खजिनदार अविनाश पाटील यांच्या शिष्टमंडळाने परिवहन मंत्री परब यांची भेट घेत त्यांच्या निदर्शनास आणले होते. परिवहन विभागाच्या या निर्णयामुळे लॉटरी विक्रेत्यांना दिलासा मिळणार असल्याची भावना यावेळी वारंग यांनी यावेळी व्यक्त केली.
रिपोर्टर