Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्यूज.
थोडक्यात महत्वाची बातमी...
सततच्या व जोरदार पावसामुळे मुंबईत दोन दिवसांपूर्वी उद्भवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने, पावसाळा विषयक कामांचा महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी आज फेरआढावा घेतला.
मुंबई : संदिप शांताराम शिंदे.
सततच्या व जोरदार पावसामुळे मुंबईत दोन दिवसांपूर्वी उद्भवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने, पावसाळा विषयक कामांचा महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी आज फेरआढावा घेतला. तसेच महापालिका वॉर्ड च्या सहाय्यक आयुक्त तथा यंत्रणेला विविध निर्देश दिले.
????मुंबईतील अतिसखल, सखल भागात पाणी साचू नये, साचलेल्या पाण्याचा जलदगतीने निचरा व्हावा यासाठी अधिक प्रभावीपणे उपाययोजना राबवाव्यात.
????पाणी उपसा करण्यासाठी तैनात केलेले उदंचन संच वेळेत सुरु होतील, याची खबरदारी घ्यावी.
????नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे विहित कालावधीत पूर्णत्वाकडे न्यावीत.
????काँक्रिट रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यावर तेथील पर्जन्य जलवाहिन्या योग्यरितीने स्वच्छ कराव्यात.
????रस्त्यांवरील सर्व पर्जन्य जल वाहिन्या / सांडपाणी वाहिन्या यांच्या मनुष्य प्रवेशिका (मॅनहोल) झाकणे तपासावीत.
????कामाच्या वेळी पडलेले बांधकाम साहित्य / राडारोडा काढून टाकावे.
????आवश्यक तेथे अतिरिक्त यंत्रणा, मनुष्यबळ नेमून कामांना वेग द्यावा.
????सर्व परिमंडळांचे उप आयुक्त, सहायक आयुक्त यांनी दररोज सकाळ, सायंकाळ विभागात (वॉर्ड) प्रत्यक्ष कार्यस्थळी भेट देऊन पाहणी करावी.
????पाणी साचण्याच्या ठिकाणांवर लक्ष केंद्रीत करून पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखाव्यात.
????पावसामुळे निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती सक्षमपणे हाताळण्यासाठी महानगरपालिका यंत्रणा सुसज्ज असावी.
????अद्ययावत संसाधनांचा वापर करून रस्त्यांवरील खड्डे तातडीने भरावेत.
????आपत्कालीन संवाद यंत्रणा अधिक प्रभावी करावी, इत्यादी निर्देश श्री. गगराणी यांनी दिले.
????महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या या बैठकीस अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त, पर्जन्य जलवाहिनी, रस्ते आणि वाहतूक, आपत्कालीन व्यवस्थापन विभाग आदींचे अधिकारी उपस्थित होते.
रिपोर्टर