Breaking News
राज्यात १ डिसेंबरपासून सरसकट शाळा सुरू
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
राज्यात १ डिसेंबरपासून सरसकट शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात १ ते १२ वीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनामुळे राज्यातील शाळा बंद होत्या. अखेर सरसकट शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे.
ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात आठवी ते बारावीच्या शाळा सुरु होत्या. दरम्यान, आता ग्रामीण भागात पहिली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवीचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडी यांनी सांगितले. येणाऱ्या काळात आम्ही चर्चा करू. उद्या अधिकाऱ्यांशी आम्ही बोलू. आठ दिवस आम्ही पालकांशी, अधिकाऱ्यांशी चर्चा करू. सुरक्षित वातावरण कसे देता येईल यावर भर देऊ, यासह निवासी शाळाबाबत आम्ही लवकर निर्णय घेऊ, असे गायकवाड म्हणाल्या.
दिवाळीनंतर काय परिस्थिती आहे हे पाहून आम्हीहा निर्णय घेतला आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
आरोग्य विभागाचा निर्णय आल्यानंतर आम्ही या शाळा सुरू करत आहोत. गेल्या मागील काळात आम्ही मोठी खबरदारी घेतली होती. ही सर्व मुले लहान आहेत. मात्र तरीही या मुलांना शाळेत आणणे महत्वाचे आहे. टास्क फोर्सशी देखील आम्ही चर्चा करणार आहोत. शिक्षकांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे यावर आम्ही अभ्यास केला आहे, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
रिपोर्टर