Breaking News
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी शरद पवार यांचा दणदणीत विजय
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पँनेलचा एकतर्फी विजय झाला. अध्यक्षपदी शरद पवार हे निवडून आले. शरद पवार हे अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार होते. या निवडणुकीत ३४ पैकी ३१ जणांनी मतदान केले. यामध्ये २९ मते शरद पवार यांना, तर दुसरे उमेदवार धनंजय शिंदे यांना अवघी २ मते मिळाली.
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या निवडणुकीत उपाध्यक्षपदासाठी विद्या चव्हाण, प्रभाकर नारकर, शशी प्रभू, माजी न्यायमूर्ती अरविंद सावंत, प्रदीप कर्णिक, प्रभाकर नारकर, अमला नेवाळकर, डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचा विजय झाला आहे. तर संतोष कदम, रजनी जाधव, आनंद प्रभू, प्रमोद खानोलकर, झुंजार पाटील, संजय भिडे आणि सुधिर सावंत यांचा पराभव झाला आहे.
२०२१ ते २०२६ या पाच वर्षांसाठी हे पदाधिकारी निवडण्यात आले आहेत. निवडणूक अधिकारी म्हणून किरण सोनवणे यांनी काम पाहिले. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची निवडणूक राजकीय आखाडा बनल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्यानंतर धर्मादाय आयुक्तांकडे सुनावणी झाली होती.
रिपोर्टर