Breaking News
मुंबईच्या लालबागमधील अविघ्न पार्क इमारतीच्या १९ व्या मजल्यावर भीषण आग
- जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून उडी मारल्याने एकाचा मृत्यू
- अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
मुंबईच्या लालबाग परिसरातील वन अविघ्न पार्क या आलिशान इमारतीच्या १९ व्या मजल्यावर आज शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशामन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आपला जीव वाचवण्यासाठी एका इसमाने इमारयीच्या १९ व्या मजल्यावरुन उडी मारल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. आगीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मुंबईतील लोअर परळ परिसर आणि करी रोड परिसरात असणारी वन अविघ्न पार्क या बहुमजली ऊंच इमारतीला अत्यंत भीषण आग लागली आहे. एकूण साठ मजली असलेल्या या इमारतीच्या १९ व्या मजल्यावर ही भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले आहेत. आपला जीव वाचवण्यासाठी अरूण तिवारी या ३० वर्षीय व्यक्तीने १९ व्या मजल्यावरुन उडी मारली. या व्यक्तीला केईएम या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले, मात्र या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषीत केले.
वन अविघ्न पार्क ही इमारत भारत माता थिएटर समोर आहे. अनेक उच्चभ्रू लोक मोठ्या प्रमाणावर या इमारतीत राहतात. आग लागल्यानंतर काहींनी खाली उड्या मारल्याची दृष्यही समोर आल्याचं एका खाजगी वाहिनीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. आत्तापर्यंत २५ व्या मजल्यापर्यंत भीषण आग पोहोचली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
रिपोर्टर