Breaking News
वाल्मिकी नगरमधील एसआरए परियोजनेला विद्यापीठाचा विरोध
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
वांद्र्यात विविध ठिकाणी सरकारची परियोजनाच्या अंतर्गत मोफत घरे देण्याची काम सुरू आहे. पण वाल्मिकी नगर आणि भारत नगरमध्ये राहणाऱ्या झोपडी धारकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेला मुंबई विद्यापीठाचा सतत विरोध करत आहे. गेल्या ३० ते३५ वर्षांपासून राहणारे लोकांना बेघर करण्याचा प्रयत्न मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचा आरोप शनिवार, (ता.१६) ऑक्टोबर रोजी वाल्मिकी विकास एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून सीएसटी येथील मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला.
'कायदेशीर मुंबई शहरामधील २००० सालच्या पूर्वीपासून राहणा-या लोकांना योजनेखाली मोफत घरे देण्याची योजना आहे, मात्र सरकारच्या योजनाला हाणून पडण्याचा डाव मुंबई विद्यापीठाच्यावतीने सुरू आहे. वाल्मिकी नगर व भारत नगर मध्ये मिळून आठशे झोपडीधारकांना घरे आहेत. जर सरकारने आम्हाला घरे दिली नाहीत तर रस्त्यावर राहण्याची वेळ आमच्यावर येईल. त्यामुळे सरकारने आम्हा झोपडीधारकांना न्याय द्यावा', अशी मागणी यावेळी करण्यात आली.
रिपोर्टर