Breaking News
आंबेडकरी संघटनांचे विविध मागण्यांसाठी
आझाद मैदान येथे धरणे आंदोलन
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती, बौध्द, मागासवर्गीय समुहावर शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक नाकेबंदी करण्यात आली आहे. याबाबत मंत्री धनंजय मुंडे, बार्टी महासंचालक धम्मज्योती गजभिये, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांच्या राजीनाम्याच्या मागणी सह इतर मागण्याबाबत गुरूवारी २७ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे एक दिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले.
या आंदोलनामध्ये अन्याय-अत्याचार विरोधी संघर्ष समिती, रिपब्लिकन स्टुडंट्स युनियन, जनसंघर्ष क्रांती मोर्चा इंडियंस् सोशल मुव्हमेंट, आंबेडकरी संग्राम,कर्मवीर दादासाहेब गायकवाड भूमिहीन शेतमजूर, शेतकरी समिती, भिमयान सोशल फाऊनजेशन आदीं सहभागी झाले.
सन २०१८ रासून ७४८ हून अधिक एमफिल, पीएचडी विद्यार्थ्यांच्या थकीत फेलोशिप बार्टीमार्फत तात्काळ देण्यात यावी, बार्टीमार्फत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण संस्थांना विनानिविदा कोट्यावधी रुपयांचे कंत्राट दिले या भ्रष्टाचारी उच्चस्तरीय चौकशी व्हावी, स्कॉलरशिपकरिता उत्पन्न मर्यादा २.५ वरून ८ लाख करावी, उच्च शिक्षणातील फ्रीशिप सवलत सुरू करावी, जवळपास ९ लाखांहून अधिक मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती प्रलंबित आहेत त्या तत्काळ देण्यात याव्यात, परदेशी शिष्यवृत्ती, स्वाधार योजनेतील प्रलंबित रक्कम जमा करावी, समाज कल्याण हॉस्टेल दुरवस्थेबाबत विशेष तरतूद करावी, बार्टीमार्फत कौशल्य विकास योजनेच्या नावाखाली, माहिती पुस्तक, कॅलेंडर छपाई याकरीता देखील कोट्यावधी पैसे खर्च करणे थांबवावे. बार्टीचे समतादूत, नोडल व प्रकल्प अधिकारी बरखास्त करावे. आदी मागण्यांसह ३६ पेक्षा अधिक मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना शिष्टमंडळाच्यावयीने देण्यात आले.
यावेळी आंदोलनात अमोल वेटम, दादासाहेब यादव, आनंदा होवाळ, संतोष आठवले, ज्योतीताई बडेकर, राजेंद्र गायकवाड, ॲड. सागर पवार, सुहास कारंडे, अमित वाघवेकर, नितिन शाक्य. प्रा.डी.जी.डोंगरगावकर, जेष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, आदी सहभागी झाले होते.
रिपोर्टर