Breaking News
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्ग मुं.मे.रे.कॉ.द्वारे हिंदी पखवाडा आणि दक्षता जनजागृती सप्ताह साजरा
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (मुं.मे.रे.कॉ.) अलीकडेच हिंदी पखवाडा आणि दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला. भारतीय संस्कृती, परंपरा आणि मूल्ये जपण्यात हिंदीने प्राथमिक भूमिका बजावली आहे. हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी मुं.मे.रे.कॉ.ने विविध स्पर्धांचेही आयोजन केले होते. दक्षता जागरुकता सप्ताह पाळणे हे सर्व कर्मचारी, भागधारक, इत्यादींना एकत्र आणण्यासाठी वापरले जाणारे एक साधन आहे. त्याने भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आणि त्याविरुद्ध लढा देण्यासाठी एकत्रित सहभागी होऊन भ्रष्टाचारामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांचे अस्तित्व आणि कारणे याबाबत जनजागृतीही होते.
''मुं.मे.रे.कॉ.मध्ये हिंदी पखवाडा साजरा करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या उत्साही सहभागाबद्दल मी कौतुक करतो. दैनंदिन व्यवहारात हिंदीच्या वापराला चालना देण्याचा हा प्रयत्न होता. आम्ही मुं.मे.रे.कॉ.मध्ये न्याय्य, व्यवसायिक पद्धतींना प्रोत्साहन देणे आणि प्रामाणिकपणा आणि सचोटीची संस्कृती वाढवणे देखील सुनिश्चित करतो”, असे मुं.मे.रे.कॉ.चे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल म्हणाले.
हिंदी सप्ताहादरम्यान मुं.मे.रे.कॉ.च्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी प्रश्नमंजुषा,वैयक्तिक भाषा योगदान, विभागीय योगदान, अनुवाद आणि घोषवाक्य लेखन अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. मुं.मे.रे.कॉ.च्या अधिकार्यांनी कामाच्या ठिकाणी कामकाजाच्या सर्व पैलूंमध्ये पारदर्शकता आणि सुशासन राखण्याच्या उद्देशाने सचोटीने आचारसंहितेचे पालन करण्याचे वचन दिले. दक्षता जागरूकता सप्ताह २०२१ च्या स्मरणार्थ मुं.मे.रे.कॉ.च्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. सर्व विजेत्यांना ए.ए.भट्ट, संचालक (प्रणाली) यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
या स्पर्धेतील विजेत्यांची यादी खालील प्रमाणे आहेत
प्रश्नमंजुषा स्पर्धा: प्रथम पारितोषिक विजेते: महेश कुमार डांगे व गौरी कार्तिकेय द्वितीय पारितोषिक विजेते: नीलेश भोईर व कुशल नेहते तृतीय पारितोषिक विजेते: विपिन कुमार व अर्शद नसीम सांत्वन पारितोषिक विजेते: संजीव जैन व कु. अलका खनका
वैयक्तिक भाषा योगदान: प्रथम पारितोषिक विजेते: रुक्मेश मीना द्वितीय पारितोषिक विजेते: प्रीता नायर. तृतीय पारितोषिक विजेते: दीपक सोनावणे सांत्वन पारितोषिक विजेते: निलेश भोईर विभागीय भाषा योगदान – प्रथम पारितोषिक विजेते: वित्त आणि लेखा विभाग, मुं.मे.रे.कॉ.
अनुवाद स्पर्धा:
प्रथम पारितोषिक विजेते: दीपक सोनावणे
द्वितीय पारितोषिक विजेते: रोहित संगारे
तृतीय पारितोषिक विजेते: गणेश गव्हाणे
सांत्वन पारितोषिक विजेते: संदेश कदम व आदित्य गाडेकर
घोष वाक्य लेखन:
प्रथम पारितोषिक विजेते: अर्शद नसीम
द्वितीय पारितोषिक विजेते: संजीव जैन
तृतीय पारितोषिक विजेते: संदेश कदम
सांत्वन पारितोषिक विजेते: अलका खनका
रिपोर्टर