Breaking News
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन, भाषण खंडांचे प्रकाशन त्वरित सुरू न केल्यास आरपीआय आंदोलन छेडेल- रामदास आठवले
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन, भाषण खंडांचे प्रकाशन त्वरित सुरू करा अन्यथा राज्य सरकार विरोधात आरपीआय आंदोलन छेडेल असा इशारा केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज सोमवारी दिला.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला मार्गदर्शक आहेत. त्यांचे साहित्य भाषण आणि लेखनाचे खंड प्रकाशित करण्यात महाविकास आघाडी सरकार दुर्लक्ष करीत आहे. डॉ आंबेडकर लेखन आणि भाषण खंडाच्या नऊ लाख प्रति प्रकाशित करण्यासाठी पाच कोटींचा खरेदी केलेला कागद धूळ खात पडला आहे. ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण आणि लेखन खंडांचे साहित्य प्रकाशित करण्यात चालढकल केल्यास अधिक दिरंगाई केल्यास राज्य सरकार विरोधात रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दिला.
रिपोर्टर