Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्यूज.
थोडक्यात महत्वाची बातमी.
राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे आणि खा. श्रीकांत शिंदे यांच्या शुभहस्ते आज कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून मार्गी जात असलेल्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण ह.भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडांगण, डोंबिवली येथे करण्यात आले.
कल्याण डोंबिवली शहरांच्या विकासासाठी कायमच भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. तर येत्या काळातही आपले सरकार विकासासाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही. : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
डोंबिवली : संदिप शिंदे.
राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे आणि खा. श्रीकांत शिंदे यांच्या शुभहस्ते आज कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून मार्गी जात असलेल्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण ह.भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडांगण, डोंबिवली येथे करण्यात आले. यावेळी कल्याण डोंबिवली शहरांच्या विकासासाठी कायमच भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. तर येत्या काळातही आपले सरकार विकासासाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही, असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी खालील महत्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले :
केडीएमसी परिवहन उपक्रमाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेचे धनादेश वाटप
कल्याण टिटवाळा रिंग रोड प्रकल्प मधील पात्र लाभार्थ्यांना सदनिका हस्तांतरण
MUTP-3A कल्याण बदलापूर 3 री आणि 4 थी रेल्वे मार्गिका बाधित प्रकल्पग्रस्तांना तसेच MUTP-3A कल्याण गुड्स यार्ड उपमध्य रेल्वे प्रकल्पात बाधित प्रकल्पग्रस्तांना सदनिका हस्तांतरण
टिटवाळा येथील उद्यानाचे ऑनलाईन लोकार्पण
खंबाळपाडा येथे अद्ययावत क्रिडा संकुलाचे ऑनलाईन भूमीपूजन
महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत ठाणे पोलीस परिमंडळ 3 च्या महिला पोलिस कर्मचारी - दामिनी पथकाला 16 दुचाकी वाहन वाटप इत्यादी महत्वाच्या कार्यक्रम यावेळी पार पडले.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार सुलभा गायकवाड, आमदार राजेश मोरे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, उप-जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, सुमित अल्कोप्लास्ट कंपनीचे संचालक थॉमस क्राजका, वातसलाव लिजधर, मेहमूद सईद, प्रभाकर साळुंखे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
#Shivsena #Drshrikanteknathshinde
रिपोर्टर