Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्यूज.
थोडक्यात महत्वाची आणि मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी!
मुंबईतील 25 हजारांहून अधिक इमारतींना आता ओसी (Occupation Certificate ) मिळवण्यासाठी शासन धोरण तयार करण्याबाबतचा अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय आज महानगरपालिका, नगरविकास विभाग, महसूल विभाग आणि सहकार विभाग यांच्या संयुक्त बैठकीत निर्णय घेतला गेला.
2 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या संधीचा मुंबईकरांनी लाभ घ्यावा. अतिरिक्त वापरलेला एफएसआय असल्यास त्यासाठी प्रीमियम भरावा लागणार.
मुंबई : प्रतिनिधी.
मुंबई महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार तसेच म्हाडा, एसआरए आणि इतर प्राधिकरणांच्या नियमांनुसार बांधकाम झालेले, परंतु विविध कारणांमुळे भोगवटा प्रमाणपत्र (Occupation Certificate ) न मिळालेल्या 25 हजारांहून अधिक इमारतींना आता ओसी मिळवण्यासाठी शासन धोरण तयार करण्याबाबतचा अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय आज महानगरपालिका, नगरविकास विभाग, महसूल विभाग आणि सहकार विभाग यांच्या संयुक्त बैठकीत निर्णय घेतला गेला.
लाखो मुंबईकर अनेक वर्षांपासून स्वतःच्या घरात राहूनही कायदेशीरदृष्ट्या “बिगरवासी” म्हणून राहत होते. यासाठी नागरिकांचा कुठलाही दोष नसून, त्याकाळच्या नियमांमधील त्रुटी किंवा विकासकांच्या चुका यामुळे ही समस्या निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागामार्फत 2 ऑक्टोबरपासून नवे धोरण लागू केले जाईल. या धोरणाअंतर्गत बांधकामादरम्यान झालेल्या तांत्रिक अथवा प्रशासकीय चुका दूर करून इमारतींना सुटसुटीत प्रक्रियेद्वारे भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येईल.
याअंतर्गत परवानगीच्या क्षेत्रफळातील फरक, सेटबॅकशी संबंधित अडचणी अशा कारणांमुळे रोखल्या गेलेल्या ओसीसंदर्भातही सोडवणूक होणार आहे.
नव्या धोरणातील महत्त्वाचे मुद्दे :
• भोगवटा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सोसायट्यांनी पुढाकार घ्यावा.
• सोसायट्या एकत्रित किंवा वैयक्तिकरीत्या प्रस्ताव देऊन पार्ट-ओसी मिळवू शकतील.
• पहिल्या सहा महिन्यांत अर्ज केल्यास कोणताही दंड आकारला जाणार नाही.
• मात्र अतिरिक्त वापरलेला एफएसआय असल्यास त्यासाठी प्रीमियम भरावा लागणार.
• 2 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या संधीचा मुंबईकरांनी लाभ घ्यावा.
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मा. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनासोबतच भाजप नेते ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक खासदार पीयूष गोयल जी आणि माजी खासदार गोपाल शेट्टी जी यांच्या पुढाकाराने आजच्या बैठकीत धोरण जाहीर केले. या बैठकीस स्थानिक आमदार मनिषा चौधरी, उत्तर मुंबईतील भाजपा पदाधिकारी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
रिपोर्टर