Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्यूज.
थोडक्यात महत्त्वाची बातमी..
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षास भेट देऊन शहर आणि उपनगरातील परिस्थितीचा आढावा घेतला.
मुंबईत मागील 6 तासांत 200 मिलामीटर आणि 24 तासांत 350 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
मुंबई : संदिप शांताराम शिंदे
मुंबईत गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षास भेट देऊन महापालिका आयुक्त भूषण गगराणी व अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडून उपाययोजनांची माहिती घेत शहर आणि उपनगरातील परिस्थितीचा आढावा घेतला.
मुंबईत मागील 6 तासांत 200 मिलामीटर आणि 24 तासांत 350 मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचले असून पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेचे 525 पंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. पाण्याचा निचरा लवकरात लवकर करण्यासाठी पंप वाढवण्याचे निर्देश याप्रसंगी शिंदे साहेबांनी दिले.
मिठी नदीच्या पाण्याची पातळी 3.9 मीटरपर्यंत वाढली आहे, त्यामुळे कुर्ल्याच्या क्रांतीनगरमध्ये पाणी शिरले. येथील जवळपास 350 रहिवाशांना महापालिकेने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून वैद्यकीय अधिकारी देखील उपस्थित असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
कमी वेळात जास्त पाऊस झाल्याने मुंबईतील सखल भागात पाणी साचले आहे. सगळीकडे यंत्रणा सज्ज असून पालिकेचे अधिकारी प्रत्यक्ष फिल्डवर काम करत आहेत. घाटकोपर, कुर्ला आणि विक्रोळी पार्कसाईट येथे जिओ नेटिंगचे काम करण्यात आले आहे. दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे कायम स्वरुपी पुनर्वसन करण्यात येईल असेही यावेळी बोलताना शिंदे साहेबांनी स्पष्ट केले.
मध्य रेल्वेची उपनगरीय रेल्वे सेवा बंद राहिल्यास संध्याकाळी बेस्टकडून प्रवाशांसाठी अतिरिक्त बसेस सोडण्यात येतील असेही यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केले.
#Mumbai #HeavyRain #HeavyRainFall #EknathShinde #Maharashtra
रिपोर्टर