Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज..
मनपा डी वॉर्ड सहायक आयुक्त श्री शरद उघाडे यांचा 100% कचरा विलगीकरण करण्याचा पायलट प्रोजेक्ट.
मुंबई : संदिप शां. शिंदे
मनपा डी वॉर्डने 100% कचरा विलगीकरण करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट हाती घेतला. मनपा डी वॉर्डने 100% कचरा उगमस्थानी विलग करण्यासाठी तीन ठिकाणी पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानुसार सुमारे 200 सोसायट्यांना दररोज सुका व ओला कचरा वेगळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सूचनांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असे मनपा डी वॉर्ड विभागातून सांगण्यात आले असे समजते.
दररोज 10 मेट्रिक टन कचरा गोळा होत असून घनकचरा व्यवस्थापन (SWM) नियम, 2016 नुसार, मनपा संस्थेने उगमस्थानी कचरा व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. 100% कचरा वर्गीकरणासाठी गृहनिर्माण संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी, BMC ने 15 नोव्हेंबरपासून वरळी (जी दक्षिण) आणि खार (एच वेस्ट) येथे एक पथदर्शी प्रकल्प राबवला आहे असे सूत्रानी सांगितले.
आता मनपा डी वॉर्ड यांनी त्यांच्या परिसरात कचरा विलगीकरणाचा प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. वाँडमध्ये वाळकेश्वर, गिरगाव चौपाटी, गावदेवी, ताडदेव, हाजी अली आणि मुंबई सेंट्रल या भागांचा समावेश होतो. मनपा डी वॉर्ड धनकचरा व्यवस्थापन विभागाने मुंबई सेंट्रलमधील नेपियनसी रोड, भुलाभाई देसाई रोड आणि बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट (बीआयटी) चाळींवरील सोसायट्यांमध्ये पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे अशी माहिती धनकचरा व्यवस्थापन सहाय्यक अभियंता श्रीकांत राठोड यांनी दिली.
या भागातील सुमारे 200 सोसायट्या दररोज 10 मेट्रिक टन कचरा निर्माण करतात. गेल्या आठ दिवसांपासून सोसायट्यांमध्ये सुका आणि ओला कचरा आणि घरातील घातक कचरा वेगळा केला जात आहे.
मनपा डी वॉर्डचे सहाय्यक महापालिका आयुक्त शरद उघाडे म्हणाले, “आम्ही सुका, ओला आणि घरातील घातक कचरा वेगळा करणे बंधनकारक केले आहे. विलगीकरण केलेला कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही पथनाट्य आणि रॅलीच्या स्वरूपात जनजागृती मोहीम राबवली आहे. हा प्रकल्प यशस्वी ठरला तर काही फेरफार करून संपूर्ण प्रभागात त्याची अंमलबजावणी केली जाईल." अशी माहिती श्रीकांत राठोड यांनी दिली.
दक्षिण मुंबईतील वाढती लोकसंख्या पाहता कचऱ्याचे वर्गीकरण करणे महत्त्वाचे आहे त्यात मनपा डी वॉर्ड सहायक आयुक्त शरद उघाडे याच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या या पायलट प्रोजेक्ट चे स्थानिक जनता स्वागत करतील यात शंका नाही. परंतु हा प्रोजेक्ट लोकांमध्ये जनजागृती करणे अत्यावश्यक आहे. जेणे करून कचरा विलागीकरण करून स्वच्छ मुंबई ठेवण्यास मनपा सोबत स्थानिक मुंबईकरांचा हातभार लागेल.
रिपोर्टर