Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्यूज.
थोडक्यात महत्त्वाची बातमी.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ताडदेव मुंबई येथील बने कंपाऊंड म्युनिसिपल शाळेत माजी नगरसेविका हंसा मारू यांनी केले शालेय वह्या वाटप.
मुंबई : प्रतिनिधी.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ताडदेव, मुंबई येथील बने कंपाऊंड म्युनिसिपल शाळेत माजी नगरसेविका शिवसेना पदाधिकारी हंसा मारू यांनी वह्या वाटप केले. आणि उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
आजचे विद्यार्थी हे भारताचे भविष्य आहे. त्यांची जपणूक आणि योग्य मार्गदर्शन करणं ही आपली जबाबदारी आहे. याच उद्देशाने त्यांच्या ज्ञानाच्या गगनभरारीसाठी मजबूत पंख देण्याचे प्रयत्न माझ्या माध्यमातून होतोय यांचा आनंद आणि समाधान आहे असे सदर कार्यक्रमात हंसा मारू यांनी म्हटले.
सदर कार्यक्रम प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी विविध कला, सांस्कृतिक कार्यक्रमांचा आविष्कार सादर केला. या मुलांचं देशप्रेम आणि उत्साह बघून शालेय विद्यार्थ्यांनच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभं राहून शालेय मदत करण्याचे आश्वासन हंसा मारू यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिले.
या कार्यक्रमाला मलबार हिल विधानसभा प्रमुख लता पाटील, युवासेनाचे सौरभ दुधवाडे, निलेश पवार, वडील दिनेश मारू, भाऊ सुनील मारू, बने कंपाऊंड म्युनिसिपल ताडदेव शाळेचे मुख्यध्यापक रविंद्र पाटील आणि विद्यार्थी तथा स्थानिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर