Breaking News
मधुमेहग्रस्त नागरिकांसाठी मुंबई महानगरपालिकेची उद्याने ठरताहेत संजीवनी
- ४८८ खुल्या ठिकाणी व्यायामाची उपकरणे उपलब्ध
- बहुतांश मैदाने आणि उद्यानांमध्ये जॉगिंग ट्रॅक, योगा केंद्र यासारख्या सुविधा विनामूल्य
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
मुंबई महानगरासारख्या अत्यंत घनदाट लोकसंख्येच्या, अरुंद वसाहतींच्या शहरात मधुमेह व तत्सम आजाराने ग्रस्त नागरिकांना व्यायाम, चालणे, धावणे यासारख्या आरोग्यदायी सेवा सुविधा मिळाव्यात म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने सुमारे ४८८ खुल्या ठिकाणी व्यायामाची साधने उपलब्ध करून दिली आहेत. बहुतांश उद्यानांमध्ये जॉगिंग ट्रॅक, पदपथ, योगा आणि ध्यानधारणा केंद्र यासारख्या सुविधा विनामूल्य उपलब्ध असल्याने मधुमेह ग्रस्त नागरिकांसाठी त्या जणू संजीवनीच ठरत आहेत.