Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्यूज.
उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी विधिमंडळातील एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री दालनात विशेष बैठक पार पडली.
अंधेरी-जोगेश्वरी परिसरातील अनधिकृत मदरसे, ओयो हॉटेल्स हटवण्याची कारवाई मुंबई महानगरपालिकेकडून लवकरच केली जाईल : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
मुंबई : संदिप शां. शिंदे.
उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी विधिमंडळातील एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री दालनात पार पडलेल्या विशेष बैठकीत प्रामुख्याने, अंधेरी-जोगेश्वरी येथील पीएमजीपी कॉलनीचा म्हाडातर्फे पुनर्विकास करून रहिवाशांना 448 स्क्वेअर फुटांची घरे देण्याचे निश्चित करण्यात आले.
आरे कॉलनीतील मयूर विहार एसआरए इमारतींचा पुनर्विकास करावा तसेच आदर्श नगर वसाहत झोपडपट्टी घोषित करून पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करण्यात येईल, तसेच गोरेगाव येथील नागरी निवारा वसाहतीतील रहिवाशांना भोगवटा-2 मधून भोगवटा -1 मध्ये वर्गीकरण करण्यास मंजुरी देऊन त्यासाठी भरावे लागणारे शुल्क कमी करण्याबाबत शासन स्तरावर निर्णय घेऊ असे यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
अंधेरी येथील दत्ताजी साळवी मंडईचा एकत्रित पुनर्विकास करण्याची चाचपणी करण्याचे निर्देशही मुंबई मनपा अधिकाऱ्यांना दिले. तसेच मरोळ येथील सुकी मच्छी मार्केटसाठी भूखंड निश्चित करून त्यांचे पुनर्वसन केले जाईल. जोगेश्वरी गुंफा परिसरात वर्षानुवर्षे राहणाऱ्या 14 कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यात येईल. त्याचप्रमाणे अंधेरी-जोगेश्वरी परिसरातील अनधिकृत मदरसे, ओयो हॉटेल्स हटवण्याची कारवाई मुंबई महानगरपालिकेकडून लवकरच केली जाईल असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
यावेळी खासदार रवींद्र वायकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद बोरीकर, एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, माजी #शिवसेना नगरसेविका राजुल पटेल, अल्ताफ पेवेकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
#Mumbai #EknathShinde #Maharashtra
Ravindra Waikar
रिपोर्टर