Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्यूज.
मुंबईतील गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. कुठल्याही पात्र गिरणी कामगाराला घरापासून वंचित ठेवले जाणार नाही. गिरणी कामगारांना घरे बांधून देण्यात येतील.
शेलू येथील घरे गिरणी कामगारांना घेणे सक्तीचे नसून ऐच्छिक आहे. तसेच 2024 मध्ये घरं न घेतलेल्या गिरणी कामगारांचा घराचा दावा संपुष्टात येईल, असे होणार नसून यासंदर्भातील शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 17 रद्द करण्याचा निर्णय यावेळी जाहीर केला.
मुंबई : संदिप शिंदे.
मुंबईतील गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. कुठल्याही पात्र गिरणी कामगाराला घरापासून वंचित ठेवले जाणार नाही, याची काळजी शासन घेत आहे. मुंबई शहर व लगतच्या परिसरात जिथे जागा उपलब्ध असेल, अशा ठिकाणी गिरणी कामगारांना घरे बांधून देण्यात येतील असा निर्णय विशेष बैठकीत घेण्यात आला.
गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळावीत या मागणीसाठी आझाद मैदानात आंदोलनासाठी बसलेल्या गिरणी कामगारांच्या विविध संघटनांसोबत विधान भवनातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात विशेष बैठक पार पडली. यावेळी त्यांचे विविध प्रश्न समजून घेत त्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे निवेदन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत केले.
शेलू येथील घरे गिरणी कामगारांना घेणे सक्तीचे नसून ऐच्छिक आहे. तसेच 2024 मध्ये घरं न घेतलेल्या गिरणी कामगारांचा घराचा दावा संपुष्टात येईल, असे होणार नसून यासंदर्भातील शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 17 रद्द करण्याचा निर्णय यावेळी जाहीर केला.
गिरणी कामगारांना झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात घरे मिळवून देण्याबाबत कोटा निर्माण केला जाईल. मुंबई शहरातील मिठागरांच्या जागांवर गिरणी कामगारांच्या घरांसाठी मिळण्याबाबत केंद्राला विनंती करण्यात येत असून गिरणी कामगारांना न्याय देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार प्रसाद लाड, आमदार सचिन अहिर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, शिवसेना सह मुख्य-प्रवक्ते राजू वाघमारे आणि गिरणी कामगारांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
रिपोर्टर