Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्यूज.
थोडक्यात महत्त्वाची बातमी..
मुंबई शहर क्षेत्रात महिलांसाठीच्या योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी एक नवीन ॲप तयार करण्याच्या सूचना "चौथे महिला धोरण 2024 जिल्हास्तरीय अंमलबजावणी सुकाणु समिती" बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
मुंबई शहरातील लोकसंख्या लक्षात घेऊन येथील नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल, लहान मुलांसाठी पाळणाघर, झोपडपट्टी भागात तसेच इतर गरजू असतील त्या ठिकाणी महिला बचत गट स्थापन करणे, बचतगटांना रोटेशन पध्दतीने स्टॉल उपलब्ध करून देणे, महिलांचा पर्यटन क्षेत्रात सहभाग वाढावा यासाठी पर्यटनाचे प्रकल्प विकसित करणे, महिला मच्छिमारांसाठी शासकीय योजना राबविणे यावर भर देण्यात यावा. : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
मुंबई : संदिप शां. शिंदे.
राज्याचे चौथे महिला धोरण 2024 साली जाहीर झाले असून या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागांनी प्रभावीपणे काम करावे. या धोरणाच्या माध्यमातून राज्य शासन महिला व मुलींसाठी सक्षम वातावरण तयार करत आहे. मुंबई शहर क्षेत्रात महिलांसाठीच्या योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी एक नवीन ॲप तयार करण्याच्या सूचना आज "चौथे महिला धोरण 2024 जिल्हास्तरीय अंमलबजावणी सुकाणु समिती" च्या बैठकीत दिल्या.
मुंबई शहरातील लोकसंख्या लक्षात घेऊन येथील नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल, लहान मुलांसाठी पाळणाघर, झोपडपट्टी भागात तसेच इतर गरजू असतील त्या ठिकाणी महिला बचत गट स्थापन करणे, बचतगटांना रोटेशन पध्दतीने स्टॉल उपलब्ध करून देणे, महिलांचा पर्यटन क्षेत्रात सहभाग वाढावा यासाठी पर्यटनाचे प्रकल्प विकसित करणे, महिला मच्छिमारांसाठी शासकीय योजना राबविणे यावर भर देण्यात यावा असे निर्देशही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.
महिला समुपदेशन केंद्रात तात्काळ समुपदेशन केले जावे, वन स्टॉप सेंटर मध्ये महिलांना सर्व सुविधा द्याव्या, पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर तक्रार देताना महिलांना आधार वाटला पाहिजे. कोणत्याही दबावाला बळी न पडता तक्रार दाखल करता येईल असे वातावरण पोलीस स्टेशनमध्ये असावे असेही याप्रसंगी शिंदे यांनी सांगितले.
मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नविन सोना, जिल्हाधिकारी आंचल गोयल, अपर जिल्हाधिकारी रवि रतन कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.शिवनंदा लंगडापुरे, उपजिल्हाधिकारी महादेव किरवले, समाजकल्याण अधिकारी रविकिरण पाटील, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास मुंबई शहर शैलश भगत, मुंबई शहरच्या महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#EknathShinde #Maharashtra
रिपोर्टर