Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्यूज.
थोडक्यात महत्वाची बातमी..
शीव पूर्व - पश्चिम भागांना जोडणारा शीव (सायन) उड्डाणपूल आणि ताडदेव ते नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणारा बेलासिस उड्डाणपूल या दोन्ही पुलांच्या पुनर्बांधणीचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी दोन्ही प्रकल्प कार्यस्थळास प्रत्यक्ष भेट देऊन प्रगतीचा स्वतंत्रपणे आढावा घेतला.
मुंबई : संदिप शां. शिंदे
शीव पूर्व - पश्चिम भागांना जोडणारा शीव (सायन) उड्डाणपूल आणि ताडदेव ते नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणारा बेलासिस उड्डाणपूल या दोन्ही पुलांच्या पुनर्बांधणीचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी दोन्ही प्रकल्प कार्यस्थळास आज प्रत्यक्ष भेट देऊन प्रगतीचा स्वतंत्रपणे आढावा घेतला.
दोन्ही उड्डाणपुलाची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी कोणत्या बाबींची एकत्रित अंमलबजावणी करता येईल, याबाबत यावेळी नियोजन करण्यात आले. दोन्ही पुलांच्या रेल्वे भागातील कामे रेल्वे विभागामार्फत तर दोन्ही पुलांच्या पोहोच रस्त्यांची कामे महानगरपालिकेमार्फत केली जाणार आहेत. त्यामुळे विहित कालमर्यादेत काम पूर्ण करण्यासाठी परस्पर समन्वय ठेवावा. कामाची कालमर्यादा निश्चित करताना कोणती कामे समांतरपणे केली जाऊ शकते, याचे नियोजन करणे आवश्यक आहे, जेणेकरून वेळेचा अपव्यय टाळता येईल, असे निर्देश श्री. बांगर यांनी दिले.
वाहतूक व्यवस्थेत सुधारणा घडवून नागरिकांना दिलासा मिळावा. बांधकामाची गती आणि गुणवत्तेवर विशेष भर द्यावा, असे स्पष्ट निर्देश श्री. बांगर यांनी रेल्वे व महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले .
उड्डाणपुलांची पुनर्बांधणी करताना नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता रेल्वे प्रशासनासह महानगरपालिकेनेही घ्यावी. विविध कामे मार्गी लावण्यासाठी महानगरपालिकेच्या सर्व संबंधित विभागांनी एकत्रितपणे समन्वय राखून कार्यवाही करावी, तसेच प्रलंबित बाबी परस्पर समन्वयाने तातडीने सोडवाव्यात, असे निर्देश श्री. बांगर यांनी दिले.
#mybmcupdates
रिपोर्टर