Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्यूज
थोडक्यात महत्त्वाची बातमी..
विलेपार्ले येथील विमानतळ प्राधिकरणाच्या जागेतील जॉगर्स पार्क आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली.
फनेल झोनमधील इमारतींचा पुनर्विकास करण्याबाबत सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. पुनर्विकासाबाबतीत धोरण ठरविताना आलेल्या सूचना व हरकतींचा अभ्यास करून त्रुटी दूर करण्यात येतील. : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
मुंबई : संदिप शां. शिंदे
विलेपार्ले येथील विमानतळ प्राधिकरणाच्या जागेतील जॉगर्स पार्क आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईचे फुफ्फुस आहे. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी राष्ट्रीय उद्यान आवश्यकच असले तरी पुनर्वसनही तेवढेच गरजेचे असल्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे असे निर्देश यावेळी दिले. उद्यान परिसराच्या 10 किलोमीटर परिसरातच या रहिवाशांचे पुनर्वसन झाले पाहिजे. न्यायालयाच्या निर्देशानुसार या ठिकाणी सर्व नागरी सुविधांची उपलब्धता करून द्यावी. नागरिकांना जास्त लांब पुनर्वसन करून त्यांची गैरसोय होणार नाही, याबाबत काळजी घ्यावी, पुनर्वसन करताना नागरिकांना अतिरिक्त चटई निर्देशांक देऊन त्यांना प्रशस्त घरे मिळतील याची दक्षता घेण्यात यावी असेही निर्देश याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी दिले.
फनेल झोनमधील इमारतींचा पुनर्विकास करण्याबाबत सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. पुनर्विकासाबाबतीत धोरण ठरविताना आलेल्या सूचना व हरकतींचा अभ्यास करून त्रुटी दूर करण्यात येतील असे यावेळी शिंदे यांनी सांगितले. तसेच विलेपार्ले पूर्व भागात भारत विमानतळ प्राधिकरणाच्या जागेमध्ये असलेला जॉगर्स पार्क त्याच पद्धतीने ठेवण्याबाबत प्राधिकरणाशी चर्चा करण्यात येईल असेही याप्रसंगी स्पष्ट केले.
या बैठकीस विधान परिषदेच्या माजी आमदार विद्या चव्हाण, माजी आमदार किरण पावसकर, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव के.गोविंदराज, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर उपस्थित होते.
#Mumbai #EknathShinde
Vidya Chavan
रिपोर्टर